मुंबई । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खेळात देखील नवे नियम लागू करण्यात येत आहे. क्रिकेटची सर्वात मोठी संस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने कसोटी क्रिकेटमध्ये ‘कोरोना सब्स्टीट्यूट’ नियमांना मंजुरी दिली आहे. या नव्या नियमानुसार कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंची अदलाबदल होऊ शकते.
कसोटी सामना सुरू असताना जर एखाद्या खेळाडूला कोरोनाची बाधा झाली असेल तर स्टेडियममध्ये असलेल्या डॉक्टरांना याची माहिती दिली जाईल. त्यानंतर त्या खेळाडूला क्वारंटाइन करण्यात येईल. जर गोलंदाजाला कोरोनाची बाधा झाली तर त्याच्या बदली गोलंदाजाला संघात घेण्यात येईल तसेच फलंदाजाला कोरोनाची बाधा झाली तर त्याच्या ऐवजी फलंदाजाला खेळण्याची संधी मिळेल. हा नवा नियम केवळ कसोटी क्रिकेटमध्येच अंमलात आणला जाईल. सध्या तरी वनडे आणि टी-20 सामन्यात हा नियम लागू केला जाणार नाही.
माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समिती गठीत करण्यात आली होती . समितीने शिफारशी केलेल्या सर्व सूचना मान्य करण्यात आले आहे.
यापुढे क्रिकेटमध्ये खेळाडूंना चेंडूवर लाळ लावता येणार नाही. असे केल्यास एका डावात संघाला दोनवेळा चेतावणी देण्यात येईल. चेतावणी देऊनही जर गोलंदाज वारंवार चेंडूला लाळ लावत असल्याचे आढळून आल्यास विरोधी संघाला पाच धावा अतिरिक्त बहाल केले जातील.
नव्या नियमानुसार गोलंदाज चेंडूला लाळ लावून चमकवले तर तात्काळ पंचांना ते साफ करण्याचे निर्देश दिले आहे.
तसेच आता सामन्यांसाठी तटस्थ पंचांना पंचगिरी करता येणार नाही. स्थानिक पंचांनांच आता सामन्यात पंच म्हणून काम पाहता येणार आहे.
३२ स्केअर इंचापेक्षा मोठा लोगो खेळाडूंच्या जर्सी तसेच स्वेटरवर वापरता येणार नाही. हा नियम स्पाॅन्सर्सच्या लोगोसाठी आहे.