जगातील सर्वात मोठा खेळाचा महाकुंभ म्हणजे ऑलिम्पिक गेम्स! या गेम्सना 1896 मध्ये सुरुवात झाली. आता 26 जुलैपासून 33वं उन्हाळी ऑलिम्पिक खेळलं जाणार आहे.
पॅरिसमध्ये होणाऱ्या या ऑलिम्पिकमध्ये अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. या ऑलिम्पिकचं आयोजन करण्यासाठी पॅरिसनं 10 वर्षांपूर्वीच तयारी सुरू केली होती. पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैपासून सुरू होऊन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यावेळचं ऑलिम्पिक अगदी वेगळं आहे. चला तर मग, या बातमीद्वारे जाणून घेऊया या ऑलिम्पिकमध्ये काय नवीन गोष्टी आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा खूप खास असणार आहे, कारण हा सोहळा नदीवर होणार आहे! होय, हे खरं आहे. हा उद्घाटन सोहळा सेरी नदीवर आयोजित होईल. हजारो खेळाडू बोटीनं नदी पार करतील आणि आयफेल टॉवरच्या दिशेनं जातील. याआधी उद्घाटन समारंभ मोठ्या मैदानात किंवा स्टेडियममध्ये आयोजित केला जायचा, परंतु यंदा प्रथमच उद्घाटन सोहळा नदीवर होणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे पदकं खूप खास आहेत. प्रत्येक पदकावर आयफेल टॉवर कोरलेला आहे. पदकाच्या रचनेत फ्रान्सची झलक दिसून येते. प्रत्येक पदकाला आयफेल टॉवरचं मूळ लोखंड जोडलेलं आहे. सुवर्ण पदकाचं वजन 529 ग्रॅम, रौप्य पदकाचं वजन 525 ग्रॅम आणि कांस्य पदकाचं वजन 455 ग्रॅम आहे.
2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चार नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी ‘ब्रेक डान्सिंग’ ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच स्केट बोर्डिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट्स क्लाइंबिंगचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आलाय. याशिवाय यावेळी काही खेळ ऑलिम्पिकचा भाग नसतील. कराटे, बेसबॉल आणि सॉफ्टबॉल हे खेळ टोकियो ऑलिम्पिकचा भाग होते. मात्र पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांना जागा मिळालेली नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या चार नवीन खेळांसाठी एकही भारतीय खेळाडू पात्र ठरलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
सायना नेहवालबाबत अवमानकारक वक्तव्य भारी पडलं, युवा क्रिकेटपटूला मागावी लागली माफी
एकदा-दोनदा नव्हे, पाकिस्तानात अनेकवेळा झाला आहे भारतीय खेळाडूंवर हल्ला
अशक्य! क्रिकेट जगतातील हे 5 विश्वविक्रम मोडणे जवळपास कोणत्याही खेळाडूच्या अवाक्याच्या बाहेरच