---Advertisement---

कोरोनात आई गेली, 2 वर्षांपूर्वी वडिलही वारले; अंडर 19 टीमच्या कर्णधाराची कहाणी करेल भावूक

mohd amaan
---Advertisement---

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद अमानची भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमान याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब असून, आईचे कोरोनामुळे निधन झालेले. त्यानंतर, त्याच्या वडिलांचेही 2022 मध्ये निधन झाले. त्याचे वडील ट्रकचालक होते.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अमानने सांगितले की, “एक वेळ अशी आली होती की, मी माझ्या एका ओळखीच्या व्यक्तींना मला कोणतेही काम देण्याची विनंती केलेली. जेणेकरून मला माझ्या भावा-बहिणींना अन्न मिळेल. माझा धाकटा भाऊ अजूनही मजूर म्हणून काम करतो. पैशावरून आई आणि वडिलांमध्ये भांडण व्हायचे. तेव्हा मी माझ्या आईला सांगितले की मी माझी क्रिकेट किट विकणार आहे. ते पैसे वापरा.”

त्याने पुढे सांगितले की, “घरी पैसे नसायचे. त्यामुळे जेव्हा जेव्हा त्याला सामने खेळायला जावे लागायचे तेव्हा मी ट्रेनमध्ये टॉयलेटच्या शेजारी बसायचे. कारण, तिकीट घेण्यासाठी पैसे नव्हते. सामन्यातून मिळालेले पैसे भाऊ-बहिणीला द्यायचो. मला त्याला दोन बहिणी आणि दोन भाऊ असून, घरात मीच सर्वात मोठा आहे.” व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी त्याचा खेळ पाहून, त्याचे कौतुक केले होते.

आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून देताना अमान म्हणाला की, “यूपीसीएलच्या अक्रम भाईने मला मदत केली. अक्रम भाई यांनीच माझा खेळ पाहिला. अक्रम भाईंनी मला खूप साथ दिली. त्यांच्यामुळेच आज मी जिथे आहे तिथे पोहोचलो.” दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हीलियर्स हा त्याचा आवडता क्रिकेटपटू आहे. तर, एमएस धोनी याचे नेतृत्वकौशल्य त्याला आवडत असल्याचे त्याने सांगितले.

भारतीय अंडर-19 संघ पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध 21 सप्टेंबरपासून 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला संघ जिंकेल, असा आम्हाला विश्वास असल्याचे अमानने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

कसोटीतील आपल्या कामगिरीवर नाखूश हे गिल; म्हणाला, “जेव्हा मी मागे वळून पाहिल, तेव्हा…”
कोहली की रूट उत्कृष्ट फलंदाज कोण? माजी दिग्गजाने केले खळबळजनक वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---