भारतीय संघाचा प्रमुख लेगस्पिनर युजवेंद्र चहल आपल्या मजेदार स्वभावासाठी ओळखला जातो. तो संघात असताना ही सहकारी खेळाडूंशी गप्पागोष्टी करताना दिसतो. तसेच, तो सातत्याने सोशल मीडियावर पोस्ट देखील करत असतो. चहलप्रमाणे त्याची पत्नी धनश्री हीदेखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. चहलने आपली पत्नी धनश्रीसोबतचा एक व्हिडिओ नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये हे दांपत्य बसल्याबसल्या डान्स करताना दिसत आहेत.
चहल दाम्पत्याचा सिटिंग डान्स
भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा प्रमुख फिरकीपटू असलेला युजवेंद्र चहल हा इंस्टाग्रामवर नवनवीन गमतीदार व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्याने नुकताच आपली पत्नी धनश्री तिच्या सोबत चा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघेही बसल्या बसल्या फक्त पायांची हालचाल करत डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देताना चहलने लिहीले, ‘द फुटवर्क कपल, सांगा बरे कोणी उत्तम केले?’
या पोस्टवर कमेंट करताना प्रसिद्ध सूत्रसंचालक गौरव कपूर याने, ‘शिष्य हळूहळू शिक्षक बनतोय’ असा तर, प्रसिद्ध पंजाबी गायक जस्सी गिल याने ‘तुझे स्मित हास्य’ असे रिप्लाय दिले.
https://www.instagram.com/reel/CQIPrAMnzW-/?utm_medium=copy_link
चहलची पत्नी आहे कोरिओग्राफर
युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री ही नृत्य दिग्दर्शिका म्हणजेच कोरिओग्राफर आहे. यासोबतच तिचे वैद्यकीय शिक्षण देखील झाले असून, ती डान्स अकादमी देखील चालवते. भारतीय संघातील खेळाडू श्रेयस अय्यर व शिखर धवन यांच्यासोबतचे तिचे काही डान्स व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले होते. दुसरीकडे, युजवेंद्र चहल हा भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा प्रमुख खेळाडू मानला जातो. जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात त्याची निवड झाली असून, या संघाचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवन करेल.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा, विराट कर्णधार तर…
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ‘हे’ विक्रम आहेत फक्त भारतीय संघाच्याच नावावर
न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूने उलगडले संघाच्या विजयाचे रहस्य