भारताने आयोजित केलेल्या परंतु यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी संघांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम आपला संघ घोषित करणारा न्यूझीलंड हा पहिला देश बनला आहे. सोमवार (9 ऑगस्ट) रोजी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने, टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यावर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे.
सोमवारी न्यूझीलंड क्रिकेटने आयसीसीच्या सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या टी-20 विश्वचषकासाठी, अचानक संघाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यास अजून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे.
न्यूझीलंड टी-20 संघाच्या नेतृत्त्वाची कमान कर्णधार केन विलियम्सनच्या हाती देण्यात आली आहे. त्याने न्यूझीलंडला आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकून दिली होती. त्याचबरोबर कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली तर ऍडम मिल्लेनला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांत जबरदस्त फलंदाजी करणारा डेवॉन कॉनवे याचा या संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अनुभवी फलंदाज मार्टिन गप्टिल आणि यष्टीरक्षक फलंदाज टीम सेफर्ट यांचाही संघात समावेश आहे. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, टीम साउदी आणि ईश सोधी हा अनुभवी त्रिकूट आहे. हाच संघ भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतही खेळणार आहे.
Plenty of news from @Blackcaps today, starting with their squad for the @T20WorldCup and #INDvNZ T20Is. #T20WorldCup 🧵 pic.twitter.com/ruJ74um0Hg
— ICC (@ICC) August 9, 2021
न्यूझीलंडचे बहुतेक खेळाडू बीसीसीआयच्या बहुचर्चित टी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणार आहेत. आयपीएलच्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केले जाणार आहेत. ही स्पर्धा मार्चमध्ये सुरू करण्यात आली होती. परंतु खेळाडूंना बायो बबलमध्ये संसर्ग झाल्यानंतर उर्वरित हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
न्यूझीलंडचा टी-20 विश्वचषक संघ
केन विलियम्सन (कर्णधार), टॉड एशेल, ट्रेंट बोल्ट, डेवॉन कॉन्वे, मार्टिन गप्टिल, ग्लेन फिलिप्स, टिम सिफर्ट (यष्टीरक्षक), मार्क चॅम्पमन, डॅरेल मिशेल, जिमी नीशम, मिशेल सॅन्टनर, ईश सोधी, कायल जेमीसन, लॉकी फर्ग्युसन, टीम साउथी.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआय अध्यक्ष गांगुली पाहायला येतोय लॉर्ड्स कसोटी सामना, पण का? जाणून घ्या कारण
इंग्लंडमध्ये ‘लेडी सेहवाग’चा डंका! २२ चेंडूत ठोकलं अर्धशतक, सर्वोच्च भागिदारीचाही केला विक्रम