जागतिक कसोटी चॅम्पियनशिप तीन वर्षांनंतर आता समाप्तीच्या नजीक येऊन ठेपली आहे. २०१९ मध्ये जागतिक कसोटी कसोटी चॅम्पियनशिपला सुरवात झाली होती. यात खेळवल्या गेलेल्या अनेक रोमांचक सामन्यानंतर आता हा अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडच्या साऊथम्पटनच्या मैदानावर रंगणार आहे.
भारतविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याआधी न्यूझीलंड संघ साऊथम्पटनला पोहोचला आहे. न्यूझीलंडने आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर एक छोटासा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात न्यूझीलंड संघातील खेळाडू हॉटेलमध्ये जाताना दिसून येत आहे. न्यूझीलंडने नुकताच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघाचा आत्मविश्वास देखील वाढला आहे.
Arriving in Southampton 🚌 #WTC21 pic.twitter.com/IaVRY9EfbX
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 14, 2021
न्यूझीलंडने तब्बल २२ वर्षानंतर पहिल्यांदा इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. न्यूझीलंड संघाने दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात ८ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे जागतिक कसोटी क्रमवारीत देखील त्यांनी अव्वल स्थान गाठले. याच कारणाने आता न्यूझीलंड संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अव्वल क्रमांकाचा कसोटी संघ म्हणून उतरेल. सध्याच्या आयसीसी क्रमवारीनुसार भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे.
न्यूझीलंड संघाला आशा असेल की त्यांचा स्टार फलंदाज आणि कर्णधार केन विलियम्सन हा १८ जूनपासून सुरु होणाऱ्या अंतिम सामन्याआधी पूर्णपणे फिट व्हावा. विलियम्सनला उजव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे, ज्यामुळे तो इंग्लडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही.
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंड संघ– केन विलियम्सन (कर्णधार), टॉम बंडल, ट्रेंट बोल्ट, डेवॉन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, मॅच हेनरी, कायल जेमिसन, टॉम लॅथम, हेनरी निकोल्स, एजाज पटेल, टीम साउथी, रॉस टेलर, निल वॅगनर, बीजे वॅटलिंग आणि विल यंग
महत्वाच्या बातम्या
विश्वनाथन आनंदला हरवणारा अब्जाधीश निघाला बेईमान, संगणकाची मदत घेऊन खेळलेला सामना
क्रिकेटचा खरा जंटलमन! रहाणेच्या ‘त्या’ कृतीने भारावले होते अफगाणिस्तानचे खेळाडू
सचिन म्हणतोय, कसोटी चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडचं पारडं जड; पण का? घ्या जाणून