पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली. न्यूझीलंड संघाने सहजपणे पाकिस्तानवर मात केली. पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या जेकब डफीने आपल्या धारधार गोलंदाजीने पाकिस्तानचा फडशा पाडला. त्याने आपल्या पहिल्या आंतराष्ट्रीय टी-20 सामन्यात 4 बळी टिपले.जेकब डफीच्या गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंड संघाने पाकिस्तानला 9 गडी बाद करताना 153 धावावर रोखले. त्यानंतर न्यूझीलंड संघाने हे लक्ष्य 18.5 षटकात 5 गडी गमावून पूर्ण केले.
आॅकलंड मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शादाब खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय पाकिस्तान संघाला रुचला नाही. न्यूझीलंडने पाकिस्तान संघाचे पहिले चार गडी 20 धावा होता – होता बाद केले. या चारपैकी तीन विकेट्स पदार्पण करत असलेल्या जेकब डफीने घेतल्या.
🔷 A dazzling debut for Jacob Duffy
🔷 A fifty from Tim Seifert
🔷 A smart cameo from Mark ChapmanNew Zealand take a 1-0 lead in the T20I series against Pakistan!#NZvPAK report 👇
— ICC (@ICC) December 18, 2020
पाकिस्तानचा कर्णधार शादाब खानने 32 चेंडूत 42 धावांची खेळी करून आपल्या डावाला सावरले. त्याच्या या खेळामुळे पाकिस्तानचा 9 विकेट्स गमावून 153 धावा उभारण्यात यशस्वी ठरला. फहीम अशरफ 31, इमाद वसीम 19, मोहम्मद रिजवान 17 आणि खुशदिल शाह 16 धावा करत संघाच्या धावसंख्येत भर घातली. न्यूझीलंड संघाकडून जेकब डफीन 4 आणि स्कॉट कुगलाइन 3 विकेट्स घेतल्या.
धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंड संघासाठी सलामी फलंदाज टीम साइफर्ट याने दमदार अर्धशतक ठोकले. त्याने 43 चेंडूत 57 धावांची खेळी साकारली. मार्क चॅपमेनने 34 आणि ग्लेन फिलिप्सने 23 धावा केल्या. पाकिस्तानच्या हैरिस रउफने 3 आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच पाकिस्तानच्या इतर कोणत्याच गोलंदाजाला विकेट मिळाली नाही. पाकिस्तानच्या खराब गोलंदाजीमुळे न्यूझीलंड संघाने 5 विकेट्सने हा सामना जिंकला. या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणार्या जेकब डफीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्वाच्या बातम्या:
– AUS vs IND Test Live : दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावावर; दिवसाखेर भारताला ६२ धावांची आघाडी
– दक्षिण आफ्रिका संघावर मोठे संकट; तब्बल १० खेळाडू कोरोनाच्या विळख्यात
– श्रीलंकेला विश्वविजेतेपद मिळवून देणारे डेव व्हाटमोर आता भूषविणार या संघाचे प्रशिक्षकपद