जो कठीण काळात सुद्धा स्वतःला सावरून उभा राहतो तो खरा खेळाडू. आजवर असे कित्येक खेळाडू झाले, ज्यांच्यावर वैयक्तिक कठीण प्रसंग येऊनही आपल्या संघाचे प्रतनिधित्व करण्याला प्राधान्य दिले आहे. जे घडले त्या प्रसंगांना खेळाडू पुढे गेले आणि स्वतःचं आणि आपल्या देशाचे नाव मोठे केले. भारतीय संघाबद्दल बोलायचे झाल्यास महान फलंदाज सचिन तेंडुलकर, सध्याचे भारतीय संघाचा खेळाडू विराट कोहली, मोहम्मद सिराज यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतरही आपल्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. अशीच घटना न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटू बॉब ब्लेयरसोबत घटना घडली होती. परंतु, त्याने सुद्धा त्यावेळेस हार न मानता आपल्या संघाचे प्रतनिधित्व केले होते.
बॉब ब्लेयर यांचा जन्म २३ जून १९३२ रोजी न्यूझीलंडच्या पिटोनो शहरात झाला होता. आज त्यांचा ८९ वा वाढदिवस आहे. ब्लेयर हे एक वेगवान गोलंदाज होते.ब्लेयर यांचा आयुष्यात असाच एक कठीण प्रसंग आला होता. तेव्हा ते दक्षिण आफ्रिकाविरुद्ध जोहान्सबर्ग येथे सामना खेळत होते.
क्रिसमसच्या एक दिवसापुर्वी संध्याकाळी तंगीवई रेल्वे अपघातात त्यांचा होणाऱ्या पत्नीचा मृत्यू झाला होता. रेल्वे पुलावरून जात असताना नदीचा पूल तुटला आणि रेल्वेचे सहा डब्बे नदीत पडले आणि त्यात त्यांची होणारी पत्नीसुद्धा होती. त्या अपघातात १५१ लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या गोष्टीची बातमी मिळताच ते एकदम नरमले गेले होते. न्यूझीलंड संघाने सुद्धा त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यांनी हार मानली नव्हती. ९ गडी बाद झाल्यानंतर ब्लेयर फलंदाजीसाठी खेळपट्टीवर उतरले होते. तेव्हा स्टेडीयममध्ये उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक आश्चर्यचकित झाले होते.
ब्लेयर यांनी न्यूझीलंड संघासाठी १९ कसोटी सामने खेळले होते. कारकिर्दीत त्यांनी एकदाही ५ गडी बाद करण्याचा विक्रम केला नव्हता. १९ कसोटी सामन्यात त्यांनी ४३ गडी बाद केले होते. त्यांची सर्वश्रेष्ठ गोलंदाजी एका डावात ८५/४ आणि पूर्ण सामन्यात १४२/७ अशी राहिली होती. उजव्या हाताचे हे वेगवान गोलंदाज प्रथम श्रेणीमध्ये एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ओळखले जायचे. ११९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी ५३७ गडी बाद केले होते. एका डावात ७२ धावा देऊन ९ गडी बाद करण्याचा विक्रम सुद्धा त्यांनी केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजी, गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षण मास्टर जडेजाचा कसोटी क्रमवारीत बोलबाला, पोहोचला अव्वलस्थानी
चाहता म्हणाला, ‘प्लिज विलियम्सनला तंबूत पाठवा’; मग सोनू सूदने आपल्या उत्तरानेच केले बोल्ड
ऐतिहासिक कसोटीच्या शेवटच्या दिवसासाठी काय असणार किवींची रणनीती? साउदीने केला खुलासा