न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज डग ब्रेसवेलवर एका महिन्याची बंदी घालण्यात आली आहे. तो कोकेन वापरत असल्याचं आढळून आलं, ज्यामुळे त्याच्यावर एक महिन्याची बंदी घालण्यात आली.
या वर्षी जानेवारीमध्ये सेंट्रल स्टॅग्ज आणि वेलिंग्टन यांच्यातील टी20 सामन्यानंतर या 34 वर्षीय गोलंदाजाला प्रतिबंधित पदार्थाचं सेवन करताना पकडण्यात आलं होतं. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. ब्रेसवेलनं त्या सामन्यात 21 धावांत 2 बळी घेतले आणि फलंदाजी करताना 11 चेंडूत 30 धावा केल्या होत्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला होता.
चाचणीमध्ये त्यानं स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच या बंदी घातलेल्या पदार्थाचं सेवन केल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही मोठी बंदी घालण्यात आली नाही. याशिवाय हा प्रतिबंधित पदार्थ बंद करण्यासाठी ब्रेसवेलनं उपचार शिबिरातही भाग घेतला आहे. ही
शिक्षा त्यानं आधीच पूर्ण केली आहे. त्यामुळे तो आता पुढे खेळू शकतो.
जर आपण डग ब्रेसवेलच्या कारकिर्दीबद्दल बोललो तर, त्यानं आतापर्यंत कारकिर्दीत न्यूझीलंडकडून 28 कसोटी, 21 वनडे आणि 20 टी20 सामने खेळले आहेत. ब्रेसवेलनं कसोटीमध्ये 74 बळी घेतले. त्यानं एकदिवसीय सामन्यात 26 आणि आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 20 बळी घेतले आहेत. त्यानं मार्च 2023 मध्ये न्यूझीलंडकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
डब ब्रेसवेल आयपीएलमध्येही खेळला आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. त्याला या आयपीएलमध्ये केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल 2012 मध्ये तो आरसीबीविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. त्या सामन्यात त्यानं 4 षटकात 32 धावा देत 3 बळी घेतले होते. त्यानंतर तो आयपीएलमध्ये दिसला नाही.
हेही वाचा –
ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडणार बाबर आझम! विराट-रोहित सारख्या दिग्गजांना टाकू शकतो मागे
बॉर्डर-गावस्कर मालिकेत चेतेश्वर पुजाराची एंट्री! या नव्या भूमिकेत दिसणार
“गौतम गंभीर रडारवर आहे, ऑस्ट्रेलियात अपयशी ठरला तर….”; माजी सहकाऱ्याचं सूचक वक्तव्य