ग्रेटाउन | न्यूझीलॅंडकडून २ वनडे आणि ४ टी२० सामने खेळलेला सेथ राॅंस हा काल ग्रेटाउनमध्ये एका पबला लागलेली आग विझवण्यासाठी पूढे आला. तो न्यूझीलॅंडमधील ग्रेटाउन गावात फायर ब्रिगेडमध्ये काम करतो.
ग्रेटाउन मधील व्हाइट स्नान पबला ही आग लागली होती. सोमवारी ही आग लागली होती.
सेथ राॅंसने न्यूझीलॅंडकडून मे २०१७मध्ये वनडे पदार्पण केले होते तर तो शेवटचा सामना चक्क २५ जानेवारी २०१८ ला खेळला आहे.
३० वर्षीय राॅंसला क्रिकेटमध्ये अजुनतरी चमकदार कामगिरी करता आली नाही परंतु त्याने मैदानाबाहेर आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे.
क्रिकेट सोडून न्यूझीलॅंडचे अनेक खेळाडू बाहेर वेगवेगळी कामे करत असतात. त्यात १०० हून अधिक सामने खेळलेल्या शेन बाॅंडचाही सामावेश आहे. तो पोलीस अधिकारी म्हणून काम पाहतो.
सेथ राॅंस हा स्टेशन अधिकारी असून तो ग्रेटाउन फायर ब्रिगेडबरोबर काम करतो. ग्रेटाउन शहराची लोकसंख्या अंदाजे २२०० च्या आसपास आहे.
Only in New Zealand! This man has opened the bowling for NZ's cricketers this season but today Seth Rance was one of the staff from eight fire engines which saved an iconic pub in Greytown from burning down. Great men. pic.twitter.com/gLgdmTd6Sd
— Keith Quinn (@KeithQuinn88) February 26, 2018