न्यूझीलंड संघाचा वेगवान आणि अनुभवी गोलंदाज निल वॅगनर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. निलच्या ह्या घोषणेसह त्याची 12 वर्षांची अर्थात एका तपाच्या क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम लागला आहे. निलने न्यूझीलंडचे कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले होते. ( New Zealand fast bowler Neil Wagner retires from international cricket )
निल वॅगनरची कसोटी कारकीर्द –
निल वॅगनर याने आपल्या 12 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत 64 सामने खेळले. निलने वेस्ट इंडिज विरुद्ध 2012 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, तेव्हापासून ते आतापर्यंत या 37 वर्षीय गोलंदाजाने 122 डावांमध्ये एकूण 260 विकेट्स घेण्याचा कारनामा केला. याच निलने न्यूझीलंडला 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2021 मध्ये चॅम्पियन करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.
Neil Wagner was in tears in the press conference.
– Kiwi Legend retires from International cricket. pic.twitter.com/QweQtn8hiR
— Johns. (@CricCrazyJohns) February 27, 2024
निल सारख्या दिग्गज आणि अनुभवी खेळाडूने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली, त्यामुळे टीमला मोठा धक्का लागला आहे. तुला येत्या 2 कसोटी सामन्यांसाठी घेणार नाही, असे निवड समितीने म्हणताच या खेळाडूने कारकीर्दीला अर्जंट ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट करत खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधघून निवृत्त झाल्याची माहिती दिली.
Neil Wagner has called time on his illustrious 64-Test career for the BLACKCAPS and will bow out following the Tegel Test series against Australia, starting in Wellington on Thursday. #NZvAUS https://t.co/SrPaC66ChK
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 27, 2024
अधिक वाचा –
– IND Vs ENG : रोमहर्षक सामन्यात मालिका भारताच्या खिशात, जाणून घ्या विजयाचे 5 ठळक मुद्दे
– IND Vs ENG : रांची कसोटीत ध्रुव जुरेल ठरला विजयाचा ‘हिरो’, अन् वाढल्या पंत-इशानच्या अडचणी
– IND vs ENG : गिलचे सॉलिड अर्धशतक, भारताचा इंग्लंडवर 5 विकेट्सने दमदार विजय