या वर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच ४ एप्रिल रोजी न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी खेळाडू रॉस टेलर याने क्रिकेटला अलविदा केला होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती. मात्र, आता दोन महिने उलटूनही गेल्यानंतरही टेलर मैदानावर पुनरागमन करू शकतो. मग ते टी२०चा खेळाडू म्हणून असो किंवा प्रशिक्षक. न्यूझीलंडच्या सर्वात प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक असलेला टेलर त्या खेळाडूंपैकी एक होता, ज्याने मागील वर्षी इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाला पराभूत केले होते.
या आठवड्याच्या सुरुवातीला रॉस टेलर (Ross Taylor) याला न्यूझीलंड ऑर्डर ऑफ मेरिट (सीएनजेडएम) यासह राणीच्या वाढदिवस सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. शुक्रवारी (१० जून) त्याला प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी तयार आहेस का, असे विचारले असता त्याने स्पष्ट शब्दात नाही म्हणून सांगितले.
मात्र, पुढे बोलताना तो म्हणाला की, “मला खेळासोबतच प्रशिक्षण देण्याची गरज पडली, तर मी तयार होऊ शकतो, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला अजूनही खेळायला आवडते आणि शक्य तितके खेळायचे आहे.”
जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषमा करणारा टेलर सध्या एका क्रिकेटमध्ये गुंतलेला आहे आणि क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी तो टी२० लीगमध्ये खेळण्याचा विचार करत आहे. “मी उन्हाळी हंगामात मध्य जिल्ह्यांसोबत खेळण्यास उत्सुक आहे, काही स्पर्धा आहेत, ज्यासाठी मी करार केला आहे. मला अजूनही क्रिकेट खेळायला आवडते,” असेही पुढे बोलताना तो म्हणाला.
इंग्लंडचा नवीन मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि ऑस्ट्रेलियाचा नवीन सहाय्यक प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांसारख्या माजी सहकाऱ्यांशी करार केल्यानंतर, टेलरने सांगितले की, तो भविष्यातील प्रशिक्षकाच्या भूमिकेकडे पाहत नाही. तो पुढे म्हणाला, “मी क्रिकेटमध्ये यशस्वी झालो आहे, आशा आहे की, मी क्रिकेटनंतर जे काही करतो, त्यात यशस्वी होण्याचा ध्यास माझ्यात आहे.”
रॉस टेलरची कारकीर्द
न्यूझीलंड (Cricket New Zealand) संघातील दिग्गज आणि विश्वासू फलंदाज रॉस टेलर याने आपल्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केलेत. त्याने ११२ कसोटी सामन्यांमध्ये ४४.६६च्या सरासरीने ७६८३ धावा केल्या. यामध्ये त्याने १९ शतके आणि ३५ अर्धशतके झळकावली, तर २३६ वनडे सामन्यांमध्ये ४७.५५ च्या सरासरीने ८६०७ धावा केल्या. यामध्ये त्याने २१ शतके आणि ५१ अर्धशतके केली आहेत आणि १०२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १९०९ धावा केल्या आहेत. न्यूझीलंड संघासाठी कसोटी क्रिकेट आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा रॉस टेलरच्या नावे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इकडं भारत हारलाय अन् तरीही पाँटिंग म्हणतोय पंत आहे ‘खतरनाक’ खेळाडू, काय आहे कारण?
आयसीसीने बुमराहला घातलीय मानाची ‘टोपी’, पण का केला गेलाय ‘बूम बूम’चा सन्मान?