---Advertisement---

न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी नव्या मुख्य प्रशिक्षकांची निवड!

On: शुक्रवार, जून 6, 2025 2:46 PM
---Advertisement---

न्यूझीलंड क्रिकेटने अधिकृतरित्या रॉब वाल्टर यांना सर्व फॉरमॅटमध्ये पुरुष क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षकपदी निवडले आहे. याआधी प्रशिक्षक गैरी यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. आता ही जबाबदारी वाल्टर यांना देण्यात आली आहे. ते जुलै मध्ये जिम्बाब्वे दौऱ्यावर काम बघणार आहेत.

वाल्टर यांनी याआधी दक्षिण आफ्रिकेत पांढऱ्या चेंडू प्रशिक्षक स्वरूपात त्यांनी काम केले आहे. त्याचं हे कॉन्ट्रॅक्ट 2028 पुरुष टी 20 वर्पल्डकप पर्यंत असणार आहे. ज्याच यजमान पद ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याकडून केलं जाणार आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिका संघाला 2024 मध्ये पहिल्यांदा टी20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचवले होते.

या स्पर्धेत आफ्रिका टीम सलग आठ विजय मिळवल्यानंतर फायनलमध्ये भारतीय संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. याशिवाय साऊथ आफ्रिका संघ यावर्षी चॅम्पियन ट्रॉफीच्या लीग स्टेजमध्ये सुद्धा स्थान बनवण्यात यशस्वी झाली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---