न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याला आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात दुखापत झाली होती. विलियम्सन आयपीएलचा गतविजेता संघ गुजरात टायटन्ससाठी क्षेत्ररक्षण करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झालेली. त्यानंतर आता त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून, तो आता या वर्षभरात कोणताही सामना खेळू शकणार नाही. यामुळे त्याला आगामी वनडे विश्वचषकाला देखील मुकावे लागेल. असे असले तरी केन हा विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघासोबत भारतात मेंटर म्हणून येऊ शकतो.
केन विलियम्सन हा सध्या त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे. मात्र, मैदानावर उतरण्यासाठी त्याला आणखी सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या काळात न्यूझीलंडला अनुभवी फलंदाज व कर्णधार म्हणून त्याची उणीव भासेल. अशा स्थितीत न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी तो संघासोबत असावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले,
“केन विलियम्सन संघात नसणे ही कमजोरीचीच गोष्ट आहे. तो दुखापतीतून बरा होतोय. मात्र, विश्वचषकात खेळण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे. तसे असले तरी भारतात होणाऱ्या विश्वचषकात त्याने संघासह भारतात यावे. मेंटर म्हणून तो संघासाठी भूमिका बजावू शकतो.” भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने 2021 टी20 विश्वचषकात अशीच भूमिका बजावली होती.
केन विलियम्सन याच्याच नेतृत्वात मागील वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सुपर ओवरपर्यंत गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत व्हावे लागलेले. त्यापूर्वी 2015 वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही ते पराभूत झालेले. केनच्या अनुपस्थितीत यावेळी टॉम लॅथम संघाची धुरा वाहण्याची शक्यता आहे.
(New Zealand Head Coach Gary Stead Hoping Kane Williamson Will Mentor Newzealand In ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! रिंकूकडून 5 षटकार खाणारा गुजरातचा खेळाडू आजारी, 8 किलो वजनही उतरलं; पंड्याचा मोठा खुलासा
आयपीएलच्या पहिल्या 35 सामन्यात हे सहा धुरंधर चमकले, यादीत फक्त दोन भारतीय