---Advertisement---

अबब ! कसोटी क्रिकेटमध्ये आज घडला अजब कारनामा

---Advertisement---

दुबई | आज पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव ९० धावांत संपुष्टात आला. या सामन्यात पाकिस्तानच्या याशीर शाहने चक्क ८ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्या डावात ५ बाद ४१८ धावा केल्या.

त्याला प्रतित्तोर देताना न्यूझीलंडचा डाव आज ३५.३ षटकांत ९० धावांवर संपुष्टात आला. यात याशीर शाहने १२.३ षटकांत ४१ धावा देत ८ विकेट्स घेतल्या.

झाले हे पराक्रम-

-न्यूझीलंडने या सामन्यात बिनबाद ५० अशी सुरुवात केली होती. पुढच्या ४० धावांत त्यांचे १० खेळाडू बाद झाले.

-या डावात न्यूझीलंडचे ६ खेळाडू शून्य धावेवर बाद झाले. एका डावात सर्वाधिक खेळाडू ० धावेवर बाद होण्याच्या विक्रमाची यामुळे बरोबरी झाली. आजपर्यंत केवळ ४वेळा यापुर्वी असा नकोसा पराक्रम झाला होता.

-याशीर शाहच्या ४१ धावांत ८ विकेट्स ह्या पाकिस्तानसाठी कसोटी क्रिकेटमधील तिसरी सर्वोत्तम कामगिरी

-याशीर शाहच्या ४१ धावांत ८ विकेट्स ह्या पाकिस्तानसाठी न्यूझीलंड विरुद्धची सर्वात्तम कामगिरी आहे.

-केवळ १ तास आणि १५ मिनीटांत न्यूझीलंडचा सर्व संघ या डावात बाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट जगातील १११७ खेळाडूंना ठरला भारी, जाणून घ्या काय आहे कारण

कृणाल पंड्या आॅस्ट्रेलियात चमकला, केले हे खास विक्रम

हिटमॅन रोहित शर्मा आता या दिग्गजांमध्ये सामील

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment