भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये सध्या टी२० मालिका सुरू आहे. आतापर्यंत या मालिकेतील २ सामने पार पडले असून भारतीय संघ मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. जयपूर येथे झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने अंतिम षटकात विजय मिळवला होता. रिषभ पंतने चौकार ठोकत भारताला ५ विकेट्स राखून सामना जिंकवून दिला होता. तर रांचीतील दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने १८ व्या षटकातच ७ विकेट्सने सोपा विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने ही टी२० मालिका जिंकली आहे.
त्यामुळे ट्वीटरवर रोहित शर्मा आणि संघावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. दरम्यान सध्या न्यूझीलंड संघातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनेघन हा भारतीय चाहत्यांशी भिडला असल्याचे दिसले आहे. न्यूझीलंड संघाच्या टी२० मालिकेतील पराभवावर मॅक्लेनेघनने भारतीय चाहत्याला उत्तर दिले आहे.
तर झाले असे की, नुकतीच क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती जाहीर केलेल्या एबी डिविलियर्सला, इतर क्रिकेटपटूंप्रमाणे मॅक्लेनेघननेही शुभेच्छा दिल्या. त्याने एक पोस्ट ट्वीटरवर टाकत लिहिले की, ‘शानदार कारकीर्द, ३६० डिग्रीच्या खेळात तुम्ही एका लीडरप्रमाणे खेळलात, ज्यामध्ये गोलंदाजांची तुमच्यापुढे पळता भुई होत असे. तुम्ही एक लाजबाव चँपियन खेळाडू होता.’
Amazing career. The leader in the 360 game that bowlers now fear. Genuine champion. https://t.co/RErozxkWqI
— Mitchell McClenaghan (@Mitch_Savage) November 20, 2021
मॅक्लेनेघनच्या या ट्वीटवर एका भारतीय चाहत्याने भारत-न्यूझीलंड टी२० मालिकेवरुन प्रतिक्रिया दिली. त्याने प्रतिक्रिया देताना लिहिले की, ‘न्यूझीलंड संघ टी२० मालिका हारला आहे.’
Did they? You mean in meaningless series 72 hours after a WC final defeat with 3 games in 5 days playing a team with 10 days rest in their home conditions? https://t.co/jldmmH58YZ
— Mitchell McClenaghan (@Mitch_Savage) November 20, 2021
त्या भारतीय चाहत्याच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना मॅक्लेनेघनने लिहिले की, ‘काय ते खरचं हारले आहेत का? तुमचे म्हणणे आहे की, जी मालिका अर्थहीन आहे. कारण टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर केवळ ७२ तासांनंतर ५ दिवसांमध्ये न्यूझीलंडचा संघ ३ सामने खेळतो आहे. तेही अशा संघाविरोधात, ज्यांना आपल्या घरासारख्या स्थितीत १० दिवसांची विश्रांती घेण्याची संधी मिळाली आहे.’
NZ is to India as Aus is to NZ https://t.co/QRdPLyHGYt
— Mitchell McClenaghan (@Mitch_Savage) November 20, 2021
मॅक्लेनेघनच्या या उत्तरावर त्या भारतीय चाहत्याने सहमती दर्शवली. त्याने लिहिले की, ‘एक भारतीय दर्शक असण्याच्या नाते मी तुमच्या मताशी सहमत आहे. आम्ही आयसीसीच्या स्पर्धेत पराभूत होत आहोत, मग न्यूझीलंडविरुद्ध ५-० आणि २-० ने जिंकण्यास कसलाही अर्थ नाही.’
दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा आणि शेवटचा टी२० सामना रविवारी (२१ नोव्हेंबर) कोलकाता येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-