भारतीय क्रिकेट संघाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर वेस्ट इंडिजचा संघ न्यूझीलंडसोबत ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत पराभूत झाला आहे. शुक्रवारी (१२ ऑगस्ट) न्यूझीलंडने दुसऱ्या टी२० सामन्यात ९० धावांनी विजय मिळवत मालिका २-० ने खिशात घातली आहे. तत्पूर्वी न्यूझीलंडने पहिला टी२० सामना १३ धावांनी जिंकला होता.
दुसऱ्या टी२० सामन्यात (Second T20I Match) प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ ९ बाद १२५ धावाच करू शकला. परिणामी न्यूझीलंडने तब्बल ९० धावांच्या फरकाने हा सामना जिंकला. हा न्यूझीलंड संघाचा टी२० क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत चौथा सर्वात मोठा विजय होता.
न्यूझीलंडच्या २१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजकडून (New Zealand vs West Indies) एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. खालच्या फळीत गोलंदाज ओबेद मॅकॉयने छोटेखानी पण झंझावाती खेळी खेळत प्रभावित केले. १५ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद २३ धावा केल्या. याबरोबरच रोवमन पॉवेलने २१ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजचे वरच्या फळीतील पहिले ४ फलंदाज तर एकेरी धावेवरच बाद झाले.
या डावात मिचेल सँटनर आणि मिचेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच टीम साउदी व इश सोधी यांनीही एका विकेटचे योगदान दिले.
New Zealand take an unassailable 2-0 lead in the T20I series 💪
Watch the #WIvNZ T20I series LIVE on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺 | 📝 https://t.co/nSsPdL61GS pic.twitter.com/qXo26es7Pn
— ICC (@ICC) August 12, 2022
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक धावा फटकावल्या. त्याने ४१ चेंडू खेळताना ६ षटकार आणि ४ चौकार मारत ७६ धावांची प्रशंसनीय खेळी केली. तसेच सलामीवीर डेवॉन कॉनवेने ३४ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले. याबरोबरच डॅरी मिचेल याचीही बॅट चांगलीच तळपली. त्याने फक्त २० चेंडू खेळताना ४ षटकार मारले, तर २ चौकारही फटकावले.
या डावात गोलंदाजीत ओबेद मॅकॉयने गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली. त्याने ४ षटके फेकताना ४० धावा देत न्यूझीलंडच्या ३ फलंदाजांच्या विकेट्स काढल्या. ग्लेन फिलिप्सला त्याच्या विस्फोटक खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अगग! पाकिस्तान बोर्डाने वाढवली खेळाडूंची पगार, तरीही भारतीयांच्या तुलनेत आहेत खूपच मागे
अबकी बार, पाकिस्तान की हार! ऑसी दिग्गजाच्या मते आशिया चषकातील महामुकाबला भारतच जिंकणार
बापरे! एकाच सामन्यात ११ पैकी ७ डावखुरे क्रिकेटर खेळले होते टीम इंडियाकडून