रविवारी (12 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला. भारतीय संघ 18 गुणांसह ग्रुप स्टेजमध्ये अव्वल स्थानावर आहे. आता उपांत्य फेरीच्या सामन्यांची उत्सुकता सुरू होणार आहे. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना यजमान भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाईल. या शानदार सामन्यासाठी किवी संघ रविवारी मुंबईत पोहोचला आहे. तिथे चाहत्यांनी सर्व खेळाडूंचे उत्साहात स्वागत केले. 13व्या विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.
किवी संघ रविवारी मुंबईत पोहोचला. दिवाळीच्या सेलिब्रेशनमुळे मुंबईत झालेली गर्दी पाहून संघाचा स्टार फलंदाज डेवाॅन कॉनवेही खूप उत्साहित दिसत होता आणि त्यानेही या सणासाठी भारतीयांना शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, “सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्ही बघू शकता हा सणांचा हंगाम आहे. प्रत्येकजण खूप व्यस्त आणि उत्साही दिसत आहे.”
यासोबतच त्याने चाहत्यांच्या दिशेने ओवाळले आणि संघाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. हॉटेलवर पोहोचल्यावर सर्व खेळाडूंचे विशेष हार घालून स्वागत करण्यात आले. न्यूझीलंड संघाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मुंबईत स्वागत आणि दिवाळीच्या शुभेच्छा.’
https://www.instagram.com/reel/CzjGe5LMZKF/?utm_source=ig_embed&ig_rid=dd3ef0af-29ac-4bc4-a45b-8a7fc20dba5c
केन विल्यमसनच्या संघाने स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली होती आणि सलग चार सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर त्यांना सलग चार सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. एकेकाळी किवी संघाला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका होता, पण त्यांनी शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळवून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.
ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंडचा भारतीय संघाने चार विकेट्स राखून पराभव केला. अशा स्थितीत त्यांच्यावर नक्कीच काहीतरी दबाव असेल. मात्र, नॉकआऊट सामन्यांमध्ये त्यांचा भारताविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे आणि त्यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. (New Zealand team entered Mumbai to compete with India in the semi-final, the welcome video has come out)
म्हत्वाच्या बातम्या
न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवण्यासाठी भारताला सर्वाधिक गरज कशाची? प्रमुख खेळाडूने सांगूनच टाकले; म्हणाला…
‘पाकिस्तान क्रिकेटची आई-बहीण…’, वर्ल्डकपमधील खराब प्रदर्शनानंतर रमीज राजांच्या तळपायाची आग मस्तकात