रविवारी (१४ नोव्हेंबर) टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर आयोजित केला गेला होता. यावर्षी टी२० विश्वचषकाचे जेतेपद ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले आहे. टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड संघाचा ८ विकेट्स राखून पराभव केला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभी केली होती, पण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियासाठी हे त्यांचे टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील पहिलेच जेतेपद ठरले आहे, तर न्यूझीलंडला पुन्हा एकदा अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
न्यूझीलंडसाठी आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जाऊन पराभूत होण्याची ही चौथी वेळ आहे. रविवारच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडसोबत असे तीन वेळा झाले होते आणि ही चौथी वेळ आहे. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक वेळा पराभव पत्करलेल्या संघांचा विचार केला, तर यामध्ये न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत इंग्लंड पहिल्या, भारत दुसऱ्या आणि श्रीलंका न्यूझीलंडसह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे.
आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक वेळा पराभूत झालेले संघ
१. इंग्लंड – ६ वेळा पराभूत
२. इंग्लंड – ५ वेळा पराभूत
३. न्यूझीलंड – ४ वेळा पराभूत
३. श्रीलंका – ४ वेळा पराभूत
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावांचा डोंगर उभा केला. मात्र, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी तो पार केला. ऑस्ट्रेलियाने हा सामना २ विकेट्सच्या नुकसानावर आणि १८.५ षटकात जिंकला.
न्यूझीलंडसाठी या सामन्यात कर्णधार केन विलियम्सनने (८५) महत्वाचे योगादन दिले, पण न्यूझीलंडचा इतर एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाच्या जोस हेजलवुडने १६ धावा दिल्या आणि न्यूझीलंडचे महत्वाचे तीन विकेट्स घेतले.
ऑस्ट्रेलियासाठी फलंदाजीत मिशेल मार्शने ५० चेंडूत सर्वाधिक ७७ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला सहज विजय मिळवून दिली. त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वार्नरनेही (५३) अर्धशतक पूर्ण केले. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने या सामन्यात १८ धावा दिल्या आणि दोन विकेट्स स्वतःच्या नावावर केल्या.ट
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणारा ऑस्ट्रेलिया ६ वा संघ; पाहा आजपर्यंतच्या विजेत्यांची संपूर्ण यादी
केन विलियम्सनचा मोठा विक्रम! टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये ८५ धावा करत विश्वविक्रमाची केली बरोबरी
‘देशाला अभिमान वाटावा यासाठी परिश्रम करत राहील’, अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर शिखर धवन झाला व्यक्त