ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकामधील (T20 World Cup) सुपर 12च्या पहिल्या ग्रुपचे दोन सामने शुक्रवारी (28 ऑक्टोबर) रद्द झाले. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळले जाणारे अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे दोन सामने नाणेफेक न होता पावसामुळे रद्द झाले. यामुळे गुणतालिकेत अनेक बदल पाहायला मिळाले, मात्र न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानावर कायम आहे. त्यातच त्यांच्या संघात आणखी एका खेळाडूची भर पडणार आहे. ज्यामुळे बाकी संघाच्या अडचणीत वाढ होणार आहे.
न्यूझीलंडचा संघ शनिवारी (29 ऑक्टोबर) श्रीलंकेशी भिडणार आहे. त्याआधी न्यूझीलंडची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये वेगवान गोलंदाज टीम साऊदी (Tim Southee) याने स्फोटक फलंदाज डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) याच्या फिटनेसबाबत विधान केले. त्याने आयसीसीशी बोलताना म्हटले, “डॅरिलने सर्व टेस्ट पार केल्या आहेत. त्याला बोटाच्या दुखापतीमुळे सामन्यांना मुकावे लागले होते. तो लवकरच संघात पुनरागमन करणार आहे. माझ्यामते, तो श्रीलंकेविरुद्च्या सामन्यात खेळेल. ”
न्यूझीलंडचा संघ विश्वचषकाआधी घरच्या मैदानावर तिरंगी मालिका खेळला. त्याच्या सराव सत्रात मिचेल फलंदाजीचा सराव करत होता आणि त्यामध्ये त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे. यामुळे त्याला पाकिस्तान, बांगलादेश विरुद्ध झालेल्या तिरंगी मालिकेला मुकावे लागले होते.
मिचेल टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याला मुकला होता. तसेच अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी तो फिट होता, मात्र तो सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे तो श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात संघात परतण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मिचेलच्याजागी संघात मार्क चॅपमन याला घेतले होते. त्याला तिरंगी आणि टी20 विश्वचषकातही खेळवण्यात आले. टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.
चॅपमनची जागा धोक्यात का याबाबतही साऊदी म्हणाला, “त्याने काही वाईट केले नाही. त्याला डॅरिलच्या जागी संधी मिळाली. त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली, मात्र डॅरिल आता फिट असल्याने संघात परतू शकतो.”
मिचेल संघात आला आल्याने न्यूझीलंडच्या संघात आनंदाची लहर आली आहे. त्याने मागील वर्षीच्या टी20 विश्वचषकाच्या प्रवासात अंतिम फेरीपर्यंत महत्वाची भुमिका पार पाडली. त्याने 34.66च्या सरासरीने 208 धावा केल्या होत्या. त्याने उपांत्यफेरीत इंग्लंडविरुद्ध 47 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या होत्या.
या स्पर्धेत न्यूझीलंडेचे श्रीलंकेबरोबरच इंग्लंड आणि आयर्लंडशी खेळणे बाकी आहे. त्यातच न्यूझीलंड सुपर 12च्या पहिल्या ग्रुपच्या गुणतालिकेत तगड्या नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वेला 130 धावांवर रोखणाऱ्या गोलंदाजांवर भडकला मिसबाह उल हक, फलंदाजांविषयी नाही काढला एकही शब्द
अफलातून! 19 वर्षीय चार्लीने घेतला अविश्वसनीय कॅच, पाहून तुम्हीही तोंडात घालाल बोटे





