न्यूझीलंड आणि भारत यांच्यात रविवारी (27 नोव्हेंबर) हॅमिल्टन येथे मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळला गेला. जो पावसामुळे रद्द झाला, यामुळे भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारताने आधीच गमावला आहे. त्यातच दुसरा सामना रद्द झाल्याने मालिकेत आव्हान टिकवण्यासाठी भारताला तिसऱ्या सामन्यात विजय आवश्यक आहे.
दुसऱ्या वनडेमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. भारताच्या डावातील 4.5 षटकांचा खेळ झाला असता पावसाला सुरूवात झाली आणि खेळ काही काळासाठी थांबवण्यात आला. जेव्हा खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा सामना प्रत्येकी 29-29 षटकांचा, डावामध्ये 10 मिनिटांचा ब्रेक आणि ड्रिंक्स ब्रेक नाही हे बदल करण्यात आहे.
2ND ODI. New Zealand vs India – Match Abandoned https://t.co/frOtF82cQ4 #NZvIND
— BCCI (@BCCI) November 27, 2022
हा सामना कसाही करून भारताला जिंकायचा होता. भारताचा डाव पुन्हा सुरू झाला असता संघाने कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याची विकेट लवकरच गमावली. तो 10 चेंडूत 3 धावा करत मॅट हेन्री याचा बळी ठरला. त्याच्यानंतर खेळपट्टीवर शुबमन गिल (Shubman Gill) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) उपस्थित होते.
गिलने 42 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने नाबाद 45 धावा केल्या आहेत, दुसरीकडे सूर्यकुमारने 25 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार खेचत नाबाद 34 धावा केल्या आहेत. मात्र पावसाचा जोर वाढल्याने सामना रद्द करण्यात आला आणि यजमान संघाची मालिकेतील आघाडी 1-0 अशी कायम राहिली. दुसऱ्या सामन्यात भारताने 12.5 षटके खेळताना एक विकेट गमावत 89 धावा केल्या होत्या. New Zealand vs India second odi Match Abandoned due to rain
Handshakes 🤝 all around after the second ODI is called off due to rain.
Scorecard 👉 https://t.co/frOtF82cQ4 #TeamIndia | #NZvIND pic.twitter.com/pTMVahxCgg
— BCCI (@BCCI) November 27, 2022
वनडे मालिकेतील शेवटचा सामना 30 नोव्हेंबरला क्रिस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. तसेच या दौऱ्यात टी20 मालिका खेळली गेली. ज्यामध्ये भारताने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली. यामधीलही पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता आणि तिसऱ्या सामन्यात भारताची फलंदाजी सुरू होती तेव्हाही पावसाने खंड पाडल्याने सामना डकवर्थ लुईसच्या नियमानुसार बरोबरीत राहिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: संजू सॅमसनवर ही काय वेळ आली! संघात तर घेतले नाहीच पण ग्राऊंडवर ताडपत्री…
क्रिकेटमध्ये 8 वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ वाईट घटना, ज्यामुळे हेलावले होते संपूर्ण क्रिकेटजगत