---Advertisement---

विलियम्सन आणि न्यूझीलंड संघाकडे क्रिकेट इतिहासातील ‘अद्वितीय’ विक्रम करण्याची संधी

On: शनिवार, नोव्हेंबर 13, 2021 10:55 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांना प्रथमच हे विजेतेपद पटकावण्याची संधी असेल. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात हरला होता. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ प्रथमच अंतिम फेरीत खेळणार आहे. न्यूझीलंड संघाला क्रिकेटच्या इतिहासात एक अनोखा विक्रम करण्याची संधी मिळणार आहे, असा विक्रम आजपर्यंत कोणताही संघ नोंदवू शकलेला नाही.

क्रिकेटच्या इतिहासात एकाच वर्षात दोन आयसीसी चषक आजपर्यंत एकही संघ जिंकू शकलेला नाही. मात्र न्यूझीलंड संघांकडे ती संधी आहे. एकाच वर्षात दोन आयसीसी चषक जिंकणारा न्यूझीलंड पहिला संघ बनू शकतो. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने या स्पर्धेतील विजयाचे दावेदार समजल्या जाणाऱ्या दोन संघांना पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडचा तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला. केन विलियम्सनच्या संघाने यंदाच्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव केला. आता न्यूझीलंड संघ टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघाला एका वर्षात दोन आयसीसी स्पर्धा जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे.

सन २००७ च्या वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला गेला. याच वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. २००९ मध्ये, टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झाला होता. त्यानंतर त्याच वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना झाला होता. हा क्रम या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये खंडित झाला आहे. एकाच वर्षी आयसीसी चषकाच्या दोन अंतिम फेरीत पोहोचणारा न्यूझीलंड हा पहिला संघ ठरला आहे. टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) रंगणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---