पुणे| आज गहुंजेच्या एमसीए स्टेडिअमवर भारत विरुद्ध न्यूजीलँड संघातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील २ रा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात न्यूजीलँड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताला ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात भारतासाठी एकाच गोष्ट चांगली घडली होती, ती म्हणजे विराटने त्याचे ३१ वे शतक केले होते. हा त्याच्या कारकिर्दीतला २०० वा सामना होता.
पहिला सामना भारतीय संघ हरल्यामुळे पुण्यातील आजचा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा आहे. आजचा सामना भारतीय संघाने जिंकला तर ते मालिकेत १-१ ची बरोबरी करतील आणि पुन्हा जर पराभव स्वीकारला तर न्यूजीलँड ०-२ ने आघाडी घेऊन मालिकाही जिंकेल.
असा आहेत आजचे संघ:
भारतीय संघ: विराट कोहली(कर्णधार),रोहित शर्मा, शिखर धवन, केदार जाधव, एम.एस.धोनी, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल.
न्यूजीलँड संघ: केन विलिअमसन(कर्णधार),ट्रेंट बोल्ट,कॉलिन द ग्रॅंडहोम,मार्टिन गप्टिल, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स,कॉलिन मुनरो, मिचेल सॅन्टनेर, टीम साऊथी,रॉस टेलर, ऍडम मिल्ने