लंडन। रविवारी(14 जूलै) 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या नाट्यपूर्ण अंतिम सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरी सुटल्यानंतर बाऊंड्रीच्या फरकांमुळे इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले. त्यामुळे इंग्लंडचे 44 वर्षांनंतर विश्वचषक विजयाचे स्वप्न पूर्ण झाले.
न्यूझीलंडला या विश्वचषकाचा उपविजेता ठरला असला तरी या विश्वचषकातील मालिकावीर पुरस्कार न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला देण्यात आला आहे. त्याने या संपूर्ण विश्वचषकात शानदार कामगिरी करत न्यूझीलंडला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.
तो विश्वचषकात मालिकावीर पुरस्काराचा मानकरी होणारा केवळ दुसरा कर्णधार आहे. याआधी 1992 च्या विश्वचषकात न्यूझीलंडचेच कर्णधार मार्टिन क्रो यांना मालिकावीर पुरस्कार मिळाला होता.
विशेष म्हणजे क्रो विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार पटकावणारे पहिलेच खेळाडू देखील होते. कारण विश्वचषकाला 1975 मध्ये सुरुवात जरी झाली असली तरी मालिकावीर पुरस्कार देण्याची सुरुवात 1992 च्या विश्वचषकापासून करण्यात आली.
त्याचबरोबर विलियम्सन हा विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार मिळवणारा क्रोनंतरचा दुसराच न्यूझीलंडचा क्रिकेटपटू आहे.
विलियम्सनने या विश्वचषकात 10 सामन्यात 82.57 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 2 शतकांचा आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तो या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार मिळवणारे क्रिकेटपटू –
1992 – मार्टिन क्रो (न्यूझीलंड)
1996 – सनथ जयसुर्या (श्रीलंका)
1999 – लान्स क्लुसेनर (दक्षिण आफ्रिका)
2003 – सचिन तेंडुलकर (भारत)
2007 – ग्लेन मॅग्राथ (ऑस्ट्रेलिया)
2011 – युवराज सिंग (भारत)
2015 – मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
2019 – केन विलियम्सन (न्यूझीलंड)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–जो रुटने फलंदाजीत नाही तर आज क्षेत्ररक्षणात केला मोठा विश्वविक्रम
–मैदानात पाऊल ठेवताच केन विलियम्सनचा या दिग्गज कर्णधारांच्या खास यादीत झाला समावेश