प्रत्येक संघ क्रिकेट विश्वात नाव कमवण्यासाठी काही ना काही मेहनत करत असतो. आजकाल क्रिकेटमध्ये यश मिळवण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजीसोबत शारीरिक व्यायामामध्ये समतोल राखणे पण महत्वाचे झाले आहे. कारण आजच क्रिकेट हे जलद क्रिकेट झाले आहे. म्हणजे आजकाल खेळाडूंना एकाच प्रकरच्या क्रिकेट मध्ये खेळून चालत नाही तर, त्यांना तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मध्ये प्रतिनिधित्व करावे लागते. त्यामुळे खेळाडूंना तब्येत तंदुरुस्त ठेवणे खूप गरजेचे आहे. अश्यातच एका न्यूझीलंडच्या खेळाडूने त्यांचा संघाच्या विजयामागचे रहस्य सांगितले आहे.
हल्लीच झालेल्या इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघाने खूपच छान प्रदर्शन केले. पहिला सामना अनिर्णीत ठरल्या नंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने बाजी मारली. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीत(आयसीसी) एका गुणाचा फायदा झाला आणि त्यांनी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठले. न्यूझीलंड संघाकडे आता १२३ गुण आहेत आणि ते अव्वल स्थानी आहे. मात्र भारतीय संघाची घसरण झाली असून १२१ गुणांसह दुसऱ्या स्थानी आली आहे.
पहिल्या सामन्यात कर्णधार केन विलियम्सनच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याला खेळता आले नाही. म्हणून दुसऱ्या सामन्यात त्याचा जागी टॉम लॅथमने कर्णधारपद भूषवले. दरम्यान, टॉम लॅथमने सांगितले, “गेल्या ६-७ वर्षा पूर्वी ‘लीडरशिप’ गटाने विचार केला की, येत्या काळात आम्हाला न्यूझीलंड संघासाठी उत्तम क्रिकेट खेळायचे आहे आणि त्या साठी आम्हाला असं काही करावे लागेल जेणेकरून आमचं क्रिकेट नेहमीच वर राहील.”
त्याने सांगितले, “२०१५ च्या विश्वचषक वेळेस हा बदल घडवला गेला की, येत्या काळात आम्हाला फक्त क्रिकेटचा आनंद घेता आला पाहिजे आणि एक दुसऱ्या खेळाडूच्या सोबतीत सुद्धा त्याचा आनंद घेता आला पाहिजे.”
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत खेळणारा फिरकी गोलंदाज एजाज पटेल सांगतो, “या संघात काहीच नकारात्मक गोष्ट नाही आहे. या संघाची संस्कृती फारच छान आहे. सगळे खेळाडू सकारात्मक विचार करणारे आहेत कोणीच नकारात्मक गोष्टींबद्दल बोलत नाही. त्यामुळेच या संघाला जास्तीत जास्त विजय मिळत चालला आहे.” येत्या १८ जून रोजी न्यूझीलंड संघ भारताविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा, विराट कर्णधार तर…
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ‘हे’ विक्रम आहेत फक्त भारतीय संघाच्याच नावावर
WTC Final: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ साऊथम्पटनमध्ये दाखल