भारतीय संघाने मागील दोन वर्षांपासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारताने आयसीसी कसोटी अजिंक्यपदमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारत सध्या ज्याप्रकारे प्रदर्शन करत आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचत त्यांना विजयाचा दावेदार मानले जात आहे.
भारताची बाजू भक्कम आहे. परंतु हा सामना चुर्शीचा होईल यात काही वादच नाही, असे अनेक दिग्गजांनी मत नोंदवले आहे. तरी इंग्लंडमध्ये खेळताना भारताला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
इंग्लंडमध्ये हलके ढग येताच चेंडू जबरदस्त वळण घेऊ लागतो. अशा परिस्थितीत न्यूझीलंडकडे स्विंग गोलंदाजांची फौज असून, त्यांचे भारतीय संघातील फलंदाजांसमोर कठीण आव्हान असेल. विशेषत: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊथी हा मोठा धोका असू शकतो. भारतीय संघाला टीम साऊथीची स्विंगपासून वाचावे लागेल. टीम साउथी गेली कित्येक वर्षे न्यूझीलंडसाठी आपले वर्चस्व दाखवत आहे. त्याच्या गोलंदाजीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची स्विंग गोलंदाजी.
साऊथीची गोलंदाजी हा भारतीय फलंदाजांसाठी मोठा धोका असल्याचे मत इंग्लंडचा माजी दिग्गज फिरकीपटू मॉन्टी पानेसरनेही नोंदवले आहे.
तो म्हणाला, ‘कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना जिंकण्यास भारतीय संघाला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊथीपासून सावध रहावे लागेल. भारतीय फलंदाजांना चांगले खेळावे लागेल. इंग्लंडच्या स्विंगच्या परिस्थितीत साउथी भारतीय संघाच्या अडचणी वाढवू शकतो. साऊथी त्याच्या स्विंगमुळे त्रास देऊ शकतो.’
पानेसरने साऊथीचे धोकादायक व हुशार गोलंदाज म्हणून वर्णन केले आणि तो म्हणाले ‘मला वाटते संघाला टिम साऊथी एक मोठा धोका असेल. साऊथी सुद्धा हुशार गोलंदाज आहे. तो क्रीजचा पूर्ण वापर करून चेंडूतून भारतीय फलंदाजांना त्रास देऊ शकतो. ते न्यूझीलंडचे भारताविरूद्ध प्राणघातक शस्त्र ठरू शकतात. ”
इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज पानेसरने न्यूझीलंड संघाची बाजू भारतापेक्षा किंचित जड असल्याचे म्हटले. तो पुढे म्हणाला, की, “न्यूझीलंडचा बाजू जड आहे कारण त्यांच्यात एक प्रकारची दिशा आहेत. त्याच्याकडे डाव्या हाताचे आणि उजव्या हाताच्या दोन्ही गोलंदाज आहेत. त्याशिवाय काईल जेमीसन सारखा उंच गोलंदाज देखील आहेत. अशा परिस्थितीत भारतीय फलंदाजांना त्यांच्यासमोर समतोल राखणे कठीण वाटू शकते.”
महत्त्वाच्या बातम्या –
सावधान! प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत इंग्लंडला पराभूत करत न्यूझीलंडने दिला भारतीय संघाला इशारा
“इंग्लंड संघाच्या खराब कामगिरीसाठी टी२० लीग जबाबदार”