सध्या सर्वत्र देशांतर्गत दौऱ्यांचे वारे वाहत आहेत. प्रत्येक संघ कोणत्या ना कोणत्या देशात जाऊन क्रिकेटचे सामने खेळण्यात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत आता भारतीय ‘अ’ संघाला देखील सामने खेळण्यासाठी एक सुवर्ण संधी मिळाली आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.
भारत ‘अ’ संघ आठ महिन्यांतील पहिला स्पर्धात्मक सामना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध खेळेल तर ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ नोव्हेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येईल. इंडिया ‘अ’ संघाच्या या मालिकेचे आयेजन ‘व्हीव्हीएस लक्ष्मण आणि त्यांचे एनसीए सपोर्ट स्टाफ ग्रुप साईराज बहुले आणि सितांशु कोटक यांच्याद्वारे केले जाईल’, असे वृत्त प्राप्त झाले आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा