भारताचे माजी कबड्डीपटू एल श्रीनिवास रेड्डी यांची नुकतीच भारतीय कबड्डी संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाली.
भारतीय संघ दुबई मास्टर्स स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी त्यांचे भारतीय कबड्डी संघाचे प्रशिक्षक होण्याचे स्वप्न सत्यात उतरल्याचे म्हटले आहे.
“माझे भारतीय संघाचे प्रशिक्षक होण्याचे स्वप्न सत्यात उतरले. मी तेलंगानातील छोट्या गावातून येऊन पुढे भारतीय कबड्डी संघासाठी खेळलो. मी 2013 पासून प्रशिक्षण देण्याचे काम करतोय. मी भारतीय संघाबरोबर काम करण्यास उत्सुक आहे.” असे भारताचे नवनियुक्त प्रशिक्षक रेड्डी म्हणाले.
“प्रशिक्षक महणून, मी खेळडूंना त्यांच्या खेळाचा आनंद लुटायला सांगणार आहे. मी भारतीय संघासाठी खेळताना हेच करत होतो. जेव्हा खेळाडू म्हणून खेळता तेव्हा तुमच्यावर फक्त खेळण्याची जबाबदारी असते. पण प्रशिक्षक म्हणून तुम्ही पूर्ण संघास जबाबदार असता.” असे यापूर्वी ऑस्ट्रेलियन कबड्डी संघाला प्रशिक्षण दिलेले श्रीनिवास रेड्डी म्हणाले.
श्रीनिवास रेड्डी 2005 साली इराणमधील एशियन कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या संघाचे सदस्य आहे. त्यांनी यापूर्वी प्रो-कबड्डी स्पर्धेत जयपूर पिंक पॅन्थर्स, तेलगू टायटन्स आणि हरियाणा स्टीलर्स या संघांनाही प्रशिक्षण दिले आहे.
तसेच श्रीनिवास रेड्डी यांनी ऑस्ट्रेलिया आणि रिपब्लिक ऑफ कोरीया या आंतरराष्ट्रीय संघानाही प्रशिक्षण दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
–२२ वर्षांपूर्वी भारतीय कसोटी क्रिकेटचा इतिहास नव्याने लिहिला गेला
–शिखर धवनची आयसीसी कसोटी क्रमवारीत जोरदार मुसंडी!