मेजर लीग क्रिकेट 2025 मध्ये सध्या सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडमचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न संघाने 269 धावांचा हिमालयाइतका मोठा धावसंख्या उभारला. ज्यामध्ये फिन अॅलनने संघासाठी तुफानी फलंदाजी केली आणि विरोधी संघाच्या गोलंदाजांना धुडकावून लावले.
वॉशिंग्टन फ्रीडमविरुद्धच्या सामन्यात सलामीला आलेल्या अॅलनने फक्त 51 चेंडूत 151 धावा ठोकत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 19 षटकार खेचले. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ झाले.
या शानदार कामगिरीमुळे फिन अॅलनने टी-20 च्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. याआधी हा विक्रम ख्रिस गेल आणि साहिल चौहान यांच्या नावावर होता. आता अॅलनने त्यांचा विक्रम मोडून 19 षटकारांसह अव्वल स्थान पटकावले आहे.
टी-20 क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज:
फिन अॅलन- वॉशिंग्टन फ्रीडम 2025 – 19
ख्रिस गेल- ढाक डायनामाइट्स 2017 – 18
साहिल चौहान- सायप्रस 2024- 18
याशिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आयपीएल 2013च्या सामन्यात आरसीबीकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध 175 धावा केल्या. आता हा विक्रम 25 धावांनी वाचला, कारण फिल अॅलनने 151 धावांची खेळी खेळली आहे.