---Advertisement---

आधी शतक आता हॅट्ट्रीक, मुंबईचा हा खेळाडू रणजी ट्राॅफीमध्ये घालतोय धुमाकूळ, टीम इंडियामध्ये परतणार?

---Advertisement---

सध्या रणजी ट्रॉफीमध्ये दुसऱ्या टप्यातील सामने आयोजित केले जात आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाचे अनेक दिग्गज खेळाडूही सहभागी होत आहेत. दरम्यान, बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर असलेल्या या खेळाडूने उत्तम कामगिरी केली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शार्दुल ठाकूर आहे. शार्दुल ठाकूर बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. त्याने टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी आपली छाप सोडण्यास सुरुवात केली आहे. शार्दुलने नुकतेच जम्मू आणि काश्मीरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शतक झळकावले होते. आता पुढच्याच सामन्यात मेघालयविरुद्ध त्याने हॅटट्रिक घेतली आहे.

मुंबई विरुद्ध मेघालय यांच्यात सुरू असलेल्या रणजी सामन्यात शार्दुल ठाकूरने शानदार कामगिरी केली आहे. मेघालय विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने तिसऱ्या षटकात हॅटट्रिक घेतली. या सामन्यात शार्दुल ठाकूरने बालचंद्रन अनिरुद्ध, सुमित कुमार आणि जसकीरत सिंग सचदेवा यांना बाद केले आहे. हे तिन्ही फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यामुळे मेघालयने अवघ्या दोन धावांच्या अंतरावर आपले सहा विकेट गमावले. शार्दुल ठाकूर उत्तम फॉर्ममध्ये आहे. यापूर्वी, जम्मू आणि काश्मीरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने पहिल्या डावात 57 चेंडूत 51 धावा आणि दुसऱ्या डावात 135 चेंडूत 119 धावा केल्या होत्या.

टीम इंडिया आता जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ज्यामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. शार्दुल ठाकूर या मालिकेसाठी पूर्णपणे तयार दिसतोय. इंग्लंडमध्ये टीम इंडियाला एका वेगवान गोलंदाजीच्या अष्टपैलू खेळाडूचीही आवश्यकता असेल. अशा परिस्थितीत शार्दुल ठाकूर हा टीम इंडियासाठी पहिली पसंती असू शकतो. इंग्लंडमधील त्याचा रेकॉर्ड खूपच अद्भुत आहे. अशा परिस्थितीत शार्दुल ठाकूरही रणजी हंगामात चांगली कामगिरी करत आहे.

हेही वाचा-

किंग कोहलीसाठी स्टेडियमबाहेर तुफान गर्दी, विराटच्या नावानं मैदान दणाणलं..! पाहा VIDEO
टीम इंडियामध्ये आणखी एका डीएसपीचा समावेश, मोहम्मद सिराजनंतर या क्रिकेटपटूनं स्वीकरला पदभार
डीएसपी मोहम्मद सिराज या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा, डेटिंगच्या चर्चांना उधाण!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---