भारत-इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरवात होत आहे.
या कसोटी मालिकेत ५-० अशा पराभवानंतरी आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचे अव्वल स्थान कायम राहणार आहे.
सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ १२५ रेटिंग्ससह अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी ११२ रेटिंग्ससह दक्षिण आफ्रिका आहे.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा ५-० पराभव झाल्यास भारतीय संघाची ११२ रेटिंग्सवर घसरण होईल.
सध्या दक्षिण आफ्रिका श्रीलंके विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.
यामधील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवल्यानंतरही त्यांना भारताच्या ११२ रेटिंग्स पुढे जाता येणार नाही. त्यामुळे भारताच्या अव्वल स्थानाला कोणताही धोका नाही.
यावेळी ९७ रेटिंग्ससह पाचव्या स्थानी असलेल्या इंग्लंडला भारतावर ५-० असा विजय मिळवण्यास, आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल तीन संघात स्थान मिळवण्याची संधी मिळेल.
सध्या भारतानंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी
११२ रेटिंग्ससह दक्षिण आफ्रिका आहे. तर तिसऱ्या स्थानी १०६ रेटिंग्ससह ऑस्ट्रेलिया आहे.
महत्त्वाच्या बातम्या-