टॉनटन। टॉनटन येथील कूपर क्रिकेट मैदानावर झालेल्या दुसऱ्या अनाधिकृत कसोटी सामन्यात भारतीय अ संघाने विंडीज अ चा पराभव केला.
दुसऱ्या डावात हनुमा विहारी ६८, ऋषभ पंत ६७ आणि कर्णधार करुण नायरच्या ५५ धावांच्या जिवावर भारताने वेस्ट इंडीज अ वर पाच गडी राखुन विजय मिळवला.
या विजयाबरोबरच दोन सामन्यांची कसोटी मालिका भारताने १-० अशा फरकाने जिंकली.
सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिज अ ने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद ३०१ धावा केल्या होत्या. तर भारताचा पहिला डाव फक्त १९२ धावांवर आटोपला होता.
विंडीजने दुसऱ्या डावात सर्वबाद २१० धावा केल्या होत्या. पहिल्या डावातील १२० धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील २१० धावा मिळून विंडीजने भारतीय अ संघासमोर विजयासाठी ३२१ धावांचे आव्हान ठेवले होते.
Be it India or India A, the boys are on a roll. India A first won the tri-series and have now beaten West Indies A in the longer format to clinch the series 1-0 in Taunton. pic.twitter.com/YoJqslti92
— BCCI (@BCCI) July 13, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-फिफा विश्वचषक: तिसऱ्या स्थानासाठी बेल्जियम – इंग्लंड आज लढणार
-भारताला वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी