---Advertisement---

मराठमोळ्या केदार जाधवची पाहा कशी राहिली आंतरराष्ट्रीय कारकीर्द!

On: सोमवार, जून 3, 2024 5:07 PM
---Advertisement---

भारताचा दिग्गज खेळाडू केदार जाधवनं (Kedar Jadhav) भारतीय संघ टी20 विश्वचषकाच्या दौऱ्यावर असतानाच निवृत्ती जाहीर केली. केदार जाधवचे वय 39 वर्ष आहे. त्यानं सोमवारी (3 जून) रोजी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. केदार जाधवनं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2020 साली न्यूझीलँडविरुद्ध खेळला होता.

त्यानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहलं की, “माझ्या कारकिर्दीत तुम्ही सर्वांनी मला प्रेम आणि माझं समर्थन केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. मी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे.”

 

केदार जाधवनं (Kedar Jadhav) त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 82 सामने खेळले त्यामध्ये त्यानं 1511 धावा ठोकल्या. यादरम्यान त्यामध्ये 7 अर्धशतक आणि 2 शतकांचा समावेश आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2014 साली एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केलं होतं. केदार जाधव भारतीय संघासाठी 73 एकदिवसीय सामने खेळला आहे. त्यामध्ये त्यानं 42.09 च्या सरासरीनं 1389 धावा ठोकल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वाधिक धावसंख्या 120 राहिली आहे.

केदार जाधवनं त्याच्या एकदिवसीय सामन्याच्या कारकिर्दीत फिरकी गोलंदाजीची जादू दाखवत 27 बळी घेतले आहेत. तर त्यानं टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध 2015 साली पदार्पण केलं होतं. केदार जाधव फक्त 9 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आणि 20.33च्या सरासरीनं 122 धावा बनवल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूयॉर्कमध्ये श्रीलंकन संघ हैराण! कर्णधार हसरंगाने मांडली व्यथा
रोहित शर्माला ‘या’ दिग्गज खेळाडूंचा विक्रम मोडीत काढण्याची सुवर्णसंधी!
पॅट कमिन्सचं सामान हरवलं, मॅक्सवेल-स्टार्कच्या फ्लाइटला उशीर; टी20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची दमछाक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---