मुंबई | भारताचा कर्णधार विराट कोहलीची क्रिकेट कारकिर्द दिवसें दिवस बहरत चालली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणानंतर २०१४ चा इंग्लंड दौरा वगळता जगभरात विराटच्या फलंदाजीचा डंका वाजला आहे.
आता इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी करत विराटने २०१४ चे अपयशही भरुन काढले आहे.
विराट कोहलीच्या या कामगिरीचे तोंडभरुन कौतूक करत, येत्या काही दिवसात विराट जगातील महान फलंदाज म्हणून ओळखला जाईल असे मत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने व्यक्त केले आहे.
“विराट पहिल्यापासूनच सर्वश्रेष्ठ आहे आणि तो आता महानतेच्या जवळ आला आहे. येत्या काही दिवसातच विराट महान फलंदाज म्हणून ओळखला जाईल. गेल्या काही वर्षात त्याने जगभरात ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, त्यासाठी मी त्याच्यावर खूश आहे.” असे धोनी विराटचे कौतूक करताना म्हणाला.
“विराट ज्याप्रकारे भारतीय संघाला पुढे घेउन जात आहे त्यावरुवन दिसते की तो एक उत्तम कर्णधार आहे. त्याला यासाठी कायमच माझ्या शुभेच्छा असतील.” मुंबई येथील एका कार्यक्रमात धोनी असे म्हणाला.
तसेच या कर्यक्रमात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने, तो २०१९ साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत त्याच्या क्रिकेट कारकिर्दी बाबत कोणताही निर्णय घेणार नसल्याचेही स्पष्ट केले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
क्रिकेटला द्रविड, धोनी सारख्या खेळाडूंची गरज
भारतीय संघाचा तो एकच खेळाडू घेतो गावसकरांचा सल्ला