लंडन | शुक्रवारी (१३ जुलै) अमेरिकेच्या सेरेना विलियम्यने वर्षातील तिसऱ्या ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
उपांत्य फेरीत सरेनाने जर्मनीच्या ज्युलीया गॉर्जेसला ६-२, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत १० व्या वेळी विंम्बलडनची अंतिम फेरी गाठली.
या एकतर्फी झालेल्या सामन्यात सेरेनाने ज्युलीया गॉर्जेसला सहज पराभूत केले.
शनिवारी (१४ जुलै) होणाऱ्या विंम्बलडनच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सेरेनाची लढत जर्मनीच्या अॅजेलिका कर्बरशी होणार आहे.
यापूर्वी २०१६ साली सेरेना विलियम्स आणि अॅंजेलिका कर्बर विंम्बडनच्या अंतिम सामन्यात आमने सामने आल्या होत्या. यामध्ये सरेना विलियम्सने अॅंजेलिका कर्बरवर विजय मिळवला होता.
यापूर्वी ९ वेळा विंम्बलडन स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱ्या सेरेनाने ७ विजेतेपदे मिळवली आहेत.
2002 ✅
2003 ✅
2004 ❌
2008 ❌
2009 ✅
2010 ✅
2012 ✅
2015 ✅
2016 ✅…2018?https://t.co/IoT3OlhfkX
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2018
तसेच २०१८ च्या विंम्बलडन स्पर्धेचे विजेतेपद मिळवून महिला एकेरीत सर्वाधिक २४ ग्रॅन्ड स्लॅम मिळवणाऱ्या मार्गारेट कोर्ट यांची बरोबरी करण्याची सेरेनाकडे संधी असणार आहे.
सेरेना विलियम्सने तीच्या महिला एकेरीच्या कारकिर्दीत २३ ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपदे मिळवली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारताला वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी
-फिफा विश्वचषक: तिसऱ्या स्थानासाठी बेल्जियम – इंग्लंड आज लढणार