---Advertisement---

मोठी बातमी! प्रज्ञानानंदाने रचला इतिहास मॅग्नस कार्लसनचा केला नाॅर्वे बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेमध्ये प्रथमच पराभव

Praggnanandhaa defeats Magnus Carlsen
---Advertisement---

भारताचा ग्रँड मास्टर रमेशबाबू प्रज्ञानानंदाने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला मात देत क्लासिकल बुद्धिबळ खेळामध्ये इतिहास रचला आहे. नाॅर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 18 वर्षीय रमेश बाबूने कार्लसनला चितपट केले आहे. आणि स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतील पहिला विजय मिळवला आहे. यासह त्याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील सर्व खेळाडूंवर आघाडी मिळवली आहे.

रमेशबाबू या खेळात पांढऱ्या सोगंट्यानी खेळत होता. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बुध्दी चालाकीने कार्लसनला धूळ चारली. या पराभवामुळे कार्लसन गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहचला. कार्लसन आणि प्रज्ञानानंदाने या फॉरमॅटमधील त्यांचे शेवटचे तीन सामने ड्रॉ केले होते. रमेशबाबूची बहीण वैशालीनेही महिलांच्या स्पर्धेत 5.5 गुणांसह अव्वल स्थान पटकावले.

वास्तविक, रमेशबाबूने चीनच्या डिंग लिरेनवर विजय मिळवून नाॅर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आघाडीवर आला आहे. आणि अमेरिकेचा फॅबियानो कारुआना दुसऱ्या स्थानावर आहे. तरुणांविरुद्ध अधिक संधी घेण्याच्या इच्छेमुळे कार्लसनला रमेशबाबू कडून पराभवास सामोरे जावे लागले. असे मत युनायटेड स्टेट्सचे जीएम क्रिस्टोफर हिकारू नाकामुरा यांनी व्यक्त केले आहे.

 

प्रज्ञानानंदाने पहिल्यांदाच क्लासिक बुध्दिबळ खेळात कार्लसन विरुध्द जिंकल्यानंतर म्हणाला की, “आम्ही दोघंही खूप चांगले खेळलो दोघांनीही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले. सुरुवातीपासनूच माझी स्थिती चांगली होती. त्यामुळे शेवटी मी जिंकलो असे म्हणता येईल. या स्पर्धेच्या विजयामुळे आत्मविश्वास वाढला आहे.” तसेच तो पुढे म्हणाला की या स्तरावर खेळण्याचा माझ्याकडे पुरेसा अनुभव आहे. आणि यामुळे खेळाडूनां पराभूत करु शकतो पण यासाठी मला माझे सर्वोत्तम द्यावे लागणार आहे. आता मी तोच प्रयत्न करत आहे. अशी माझी मानसिकता आहे.

महत्तवाच्या बातम्या-
‘विराट कोहली-यशस्वी जयस्वाल’ सलामी मोर्चा सांभाळावा रोहित चाैथ्या क्रमांकावर फीट विश्वचषकापूर्वी ‘या’ दिग्गजाने दिला सल्ला
टी20 विश्वचषकापूर्वी रिषभ पंतचा व्हिडीओ व्हायरल म्हणाला, “भारतीय संघासाठी पुन्हा उभं राहणं…” पाहा व्हिडीओ
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी कोण ठरणार पात्र जाणून घ्या बीसीसीआयचे नियम व अटी?

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---