ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या टी20 विश्वचषकात पहिल्या दिवशी दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात नामिबियाने श्रीलंकेचा तर, दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सने युएईचा पराभव केला. या सामन्यात नेदरलँड्स संघासाठी मैदानात उतरलेल्या लोगन वॅन बीकने सर्वांना चकित केले. अगदी पंधरा दिवसांपूर्वी भारतात न्यूझीलंड ए संघासाठी खेळलेल्या बीकने या सामन्यात नेदरलँड्ससाठी टी20 विश्वचषकात पदार्पण केले. बीकने या सामन्यात दोन षटके टाकली. मात्र, त्याला एकही बळी मिळाला नाही.
टी20 विश्वचषकाआधी न्यूझीलंड ए संघाने भारताचा दौरा केला होता. बीक त्या संघासह भारतात आलेला. या दौऱ्यावर न्यूझीलंड ए संघाने दोन अनधिकृत कसोटी आणि 3 वनडे सामने खेळले होते. बीकने या 5 सामन्यात 7 बळी घेतलेले. चेन्नईत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने 46 धावांत 3 बळी टिपलेले. या सामन्यात पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन व कुलदीप यादव हे भारतीय संघातील प्रमुख खेळाडू खेळत होते.
बीक हा जन्माने न्यूझीलंडचा आहे. मात्र, त्याच्या आईमुळे त्याला नेदरलँड्सचे नागरिकत्व देखील मिळालेय. याच कारणाने तो दोन्ही देशांसाठी खेळू शकतो. 32 वर्षीय बीक प्रथमश्रेणी क्रिकेट न्यूझीलंडमध्ये वेलिंग्टन संघासाठी खेळतो. बीक हा 2010 अंडर नाईन्टीन विश्वचषकामध्ये न्यूझीलंड संघाचा भाग होता. तत्पूर्वी, त्याने 2009 मध्ये न्यूझीलंडसाठी अंडर नाईन्टीन बास्केटबॉल विश्वचषक देखील खेळला आहे.
नेदरलँड्स विरुद्ध युएई सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास यूएईने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना त्यांना निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावत 111 धावा चोपल्या. कमी धावांचे हे आव्हान नेदरलँड्स संघाने 3 गडी शिल्लक ठेवत पूर्ण केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात नेदरलँड्सचा दमदार विजय, यूएईचा 3 विकेट्सने पराभव
नादच खुळा! 11 वर्षीय चिमुकल्याच्या बॉलिंगचा रोहित बनला फॅन, नेट्समध्ये केला त्याचा सामना






