पावसामुळे बर्याचवेळा क्रिकेट सामन्यांना मध्येच थांबवताना पाहिले गेले आहे. परंतु आता न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेलेल्या तिसर्या टी-20 सामन्यात वेगळीच घटना घडली. क्रिकेटच्या इतिहासात दुसर्यांदा प्रखर ऊन असल्यामुळे सामना मध्येच थांबण्यात आला. ज्यानंतर फॅन्सने सोशल मीडियावर या घटनेची खिल्ली उडवली .
जास्त ऊन असल्यामुळे मध्येच थांबवला सामना
सध्या पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात नेपियर येथे तिसरा टी-20 सामना खेळला जात होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 11.4 षटकात 3 विकेट्स गमावून 85 धावा केल्या होत्या. त्यावेळी खूपच ऊन पडले. जे फलंदाजाच्या डोळ्यात जात होते. या कारणामुळे हा सामना काही कालावधीसाठी थांबण्यात आला होता.
परंतु, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना काहीवेळानंतर पुन्हा सुरू करण्यात आला. त्यांनंतर ग्लेन फिलिप्सने 20 चेंडूत 35 धावांची खेळी करून पाचव्या गड्याच्या रूपाने बाद झाला. त्याचबरोबर कुगेलीनने 14 आणि निशमने 2 धावांचे योगदान दिले, तर साउदी 6 धावांवर नाबाद राहिला त्यामुळे न्यूझीलंड संघाने 7 गडी गमावून 173 धावसंख्या उभारली. पाकिस्तान संघाकडून फहीम अशरफने 3 तर शाहीन आफ्रिदी आणि हैरिस रउफने यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
पाकिस्तान संघाने 174 धावांचा पाठलाग करताना मोहमद रिजवानने 59 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकार ठोकून 89 धावांची केली. त्याचबरोबर मोहमद हाफिजने 41 धावांची खेळी करत त्याला साथ दिली. या दोघांनी पाकिस्तान संघासाठी अत्यंत महत्वाची 112 धावांची भागीदारी केली. त्यामुळे पाकिस्तान संघाने 174 धावांचे हे लक्ष्य 19.4 षटकात पार केले. न्यूझीलंड संघावर 4 गडी राखून मात केली.
जास्त ऊन असल्यामुळे 2019 साली सुद्धा सामना थांबवला होता
या पूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सन 2019 ला झालेला क्रिकेट सामना अशाच कारणासाठी थांबला होता. त्यावेळी प्रखर उन्हामुळे सामना थांबण्याची घटना क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा घडली होती. त्यानंतर ही घटना आता न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसर्या टी-20 सामन्यात घडली.
सोशल मीडियावर फॅन्सने उडवली खिल्ली
हा सामना काही कालावधीसाठी थांबण्यात आला होता. या सामन्यात अचानक प्रखर ऊन पडले. त्यामुळे न्यूझीलंड संघातील खेळाडूंना फलंदाजी करताना त्यांच्या डोळ्याना प्रखर उन्हाचा त्रास होवू लागला आणि हा सामना थांबण्यात आला. काही कालावधीनंतर सामना पुन्हा सुरू झाला. तोपर्यंत फॅन्सने या गोष्टींची जोरदार खिल्ली उडवली. यामध्ये माजी क्रिकेटपटू वसिम जाफर यांचा ही समावेश होता.
#NZvPAK https://t.co/ntzTJwx2Rl pic.twitter.com/vJrMcJU6ff
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) December 22, 2020
Bright shining sun stops the play between New Zealand and Pakistan at Napier. #Cricket pic.twitter.com/RTdLAGPD6D
— VARUN BHASIN 🇮🇳 (@varunbhasinji) December 22, 2020
https://twitter.com/michaelcolhoun/status/1341280431501496320?s=19
Never ever but to day Sun stops the play at Mclean park, Napier. #NZvPAK pic.twitter.com/JzkMglPbo1
— Salim Hafezi (@SalimHafezi) December 22, 2020
https://twitter.com/RohanMamtora/status/1341279328454074368
Sun stops play has happened. Just Napier things.
— Shubham Pandey (@the__spectator) December 22, 2020
आता न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात २६ डिसेंबरपासून २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीच्या बाबतीत जे पहिल्या सामन्यात झालं तेच शेवटच्याही!
टीम इंडियासाठी वाईट बातमी! मोहम्मद शमी ‘इतक्या’ दिवसांसाठी क्रिकेटपासून असणार दूर
खुशखबर! ‘या’ दिवशी रोहित शर्मा भारतीय संघाशी जोडला जाणार
ट्रेंडिंग लेख –
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या ४ गोष्टी
सोळा वर्षे आणि सोळा गोष्टी! जाणून घ्या धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोमांचक प्रवास
‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर