वनडे विश्वचषक 2023 चा 11 सामना शुक्रवारी (13 ऑक्टोबर) बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बांगलादेश संघाने न्यूझीलंड समोर 245 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली होती. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडसाठी विश्वचषकातील पहिला सामना खेळत असलेला कर्णधार केन विलियम्सन व डॅरिल मिचेल यांनी नाबाद अर्धशतके करत आठ गडी राखून विजय मिळवून दिला. न्यूझीलंड संघाचा हा स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला.
बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधार केन विलियम्सनने घेतलेला हा निर्णय अगदी योग्य ठरला. ट्रे़ंट बोल्ट याने पहिल्याच चेंडूवर लिटन दास याला बाद केले. मेहदी हसन, शांतो हे प्रमुख फलंदाज संघाची धावसंख्या अवघी 56 असताना बांगलादेशच्या चार महत्वपूर्ण विकेट पडल्या होत्या. पाचव्या विकेटसाठी शाकिब अल हसन आणि मुशफिकूर रहीम यांनी 96 धावांची भागीदारी करत डाव सावरला. त्यानंतर महमदुल्लाहने नाबाद 41 धावा करत संघाला 245 पर्यंत मजल मारून दिली.
या धावांचा पाठलाग करताना रचिन रवींद्र लवकर बाद झाला. डेवॉन कॉनवेने आपला फॉर्म कायम राखत 45 धावांचे योगदान दिले. विश्वचषकात आपला पहिला सामना खेळत असलेल्या केन विलियम्सन व डॅरिल मिचेल यांनी त्यानंतर कोणतीही जोखीम न पत्करता शतकी भागीदारी केली. दुखापत झाल्याने केन 79 धावांवर रिटायर्ड हर्माट घारी परतला. मिचेलने नाबाद 89 धावा करून ग्लेन फिलिप्ससह संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंड या विजयासह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
(Newzealand Beat Bangladesh By 8 Wickets Register 3rd Win Kane Williamson Daryl Mitchell Shines)
महत्वाच्या बातम्या –
एमटी आयटीएफ एस 400 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अजित भारद्वाजला दुहेरी मुकुट
दुसऱ्या राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेला प्रारंभ, स्पर्धेत राज्यातील सुमारे १५० खेळाडू सहभागी