बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना शनिवारी (23 सप्टेंबर) खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशवर 86 धावांनी मोठा विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. विशेष म्हणजे तब्बल पंधरा वर्षानंतर न्यूझीलंडने बांगलादेशमध्ये वनडे सामना जिंकला आहे. सहा बळी घेणारा न्यूझीलंडचा अनुभवी फिरकीपटू ईश सोढी सामन्याचा मानकरी ठरला.
विश्वचषकाच्या तोंडावर आयोजित या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आघाडीचे तीन फलंदाज अपयशी ठरल्यानंतर हेन्री निकोल्स याने 49 व टॉम ब्लंडलने 69 धावा करत संघाचा डाव सावरला. खालच्या फळीत ईश सोढी याने महत्त्वपूर्ण 35 धावांचे योगदान दिले. बांगलादेश साठी खालीद अहमद व मेहदी हसन यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
विजयासाठी मिळालेल्या 255 धावांचे आव्हान पार करताना यजमान संघाचे फलंदाज सुरुवातीपासून संघर्ष करताना दिसले. तमिम इक्बाल 44 व महमदुल्लाह 49 वगळता इतर फलंदाजांना अपेक्षित फलंदाजी करता आली नाही. न्यूझीलंड संघासाठी फिरकीपटू ईश सोढी याने सर्वाधिक सहा बळी मिळवले. यासह न्यूझीलंड संघाने 86 धावांनी मोठा विजय साकार केला.
न्यूझीलंडने मागील पंधरा वर्षात बांगलादेशमध्ये मिळवलेला हा पहिला वनडे विजय आहे. यापूर्वीच्या दोन मालिकांमध्ये यजमान संघाने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिलेला.
(Newzealand Beat Bangladesh By 86 Runs Ish Sodhi Shines)
महत्वाच्या बातम्या –
खेळाडू वृत्ती! बांगलादेश-न्यूझीलंड सामन्यात फॅमिली वाली फिलिंग, लिटन दासचा धाडसी निर्णय
न भूतो…! विश्वचषक स्पर्धांमध्ये खणकलंय शाकिबचं नाणं, ‘हा’ भीमपराक्रम करणारा बांगलादेशचा एकमेव धुरंधर