भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला शुक्रवारी (27 जानेवारी) सुरुवात झाली. मालिकेतील हा पहिला सामना रांची येथील जेएससीए स्टेडियमवर खेळला गेला. वनडे मालिकेत व्हाईट वॉश स्वीकारलेल्या न्यूझीलंड संघाने या सामन्यात शानदार पुनरागमन केले. खेळाच्या तिन्ही विभागात भारतीय संघावर वर्चस्व गाजवत न्यूझीलंडने 21 धावांनी मोठा विजय मिळवला. मात्र, न्यूझीलंड संघ टी20 मध्ये भारताला भारतात नेहमीच जड गेला आहे, हे आकडेवारीवरून दिसून येते.
रांची येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत 6 बाद 176 अशी मोठी धावसंख्या उभारली. डेवॉन कॉनवे व डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडसाठी अर्धशतके साजरी केली. भारतासाठी दोन बळी घेणारा वॉशिंग्टन सुंदर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादव व वॉशिंग्टन सुंदर हेच संघर्ष करू शकले. अखेरीस न्यूझीलंडने 21 धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी मिळवली.
भारतीय संघ मायदेशात नेहमीच वरचढ असतो. मात्र, टी20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंड हा एकमेव असा संघ आहे, जो भारताविरुद्ध 200 पेक्षा कमी धावांचा बचाव करण्यात यशस्वी ठरला. न्यूझीलंडने ही कामगिरी तब्बल चार वेळा केली आहे. 2012 मध्ये चेन्नई येथे त्यांनी 167 धावांचा बचाव केला होता. 2016 टी20 विश्वचषकात त्यांनी नागपूर येथे अवघ्या 126 धावा करूनही विजय मिळवलेला. 2017 मध्ये राजकोट येथे त्यांनी 196 बनवल्यानंतरही विजय संपादन केलेला. त्यानंतर आता पुन्हा एकदा 176 धावांचा बचाव करून ही परंपरा कायम राखली.
(Newzealand Fourth Time Defend Under 200 In T20I Against India In India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफलातून! हवेत उडी मारून वॉशिंग्टनने घेतला ‘सुंदर’ कॅच; बीसीसीआयही म्हणाली, ‘व्वा काय झेल आहे’
‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’सारखीच आहे ‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजाची लव्हस्टोरी, प्रेमासाठी थेट…






