ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी20 विश्वचषकात (2022 T20 World Cup) बुधवारी (26 ऑक्टोबर) दोन सामने नियोजित होते. दिवसातील पहिल्या सामन्यात सर्वांना धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. पावसाच्या व्यत्ययात झालेल्या सामन्यात पात्रता फेरीतून पुढे आलेल्या आयर्लंडने विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या इंग्लंडला डकवर्थ लुईस नियमानुसार पाच धावांनी पराभूत केले. मात्र, न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (NZvAFG) या दिवसातील दुसऱ्या सामन्यात पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना रद्द केला गेला. सामना रद्द केला गेल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण विभागून देण्यात आला.
Rain plays spoilsport at the MCG ????
Afghanistan and New Zealand share points after the match is called off!#T20WorldCup | #NZvAFG pic.twitter.com/2Z8TmuX1gz
— ICC (@ICC) October 26, 2022
दिवसातील दोन्ही सामने मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आयोजित केले गेले होते. पहिला सामना पावसामुळे अपूर्ण राहिला. मात्र, त्या सामन्याचा निकाल पाहायला मिळाला.
मेलबर्नमध्ये सायंकाळी पावसाचा जोर कायम राहिल्याने मैदान खेळण्यासाठी पूर्णपणे सज्जन होते. सामन्याचे तीनही पंच व सामनाधिकाऱ्यांनी सामन्याच्या निर्धारित वेळेपर्यंत प्रत्येकी पाच षटकांचा सामना होईल अशी अपेक्षा व्यक्त केलेली. मात्र, पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यानंतर सामना रद्द केला गेला. त्यामुळे या दोन्ही संघांना या सामन्यातून प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले.
न्यूझीलंडने स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला 89 धावांनी पराभूत करत विजयी सुरुवात केली होती. तर, अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात इंग्लंडला जोरदार टक्कर दिलेली. मात्र, त्यांना विजय मिळवण्यात अपयश आलेले. या सामन्यानंतर अ गटातील समीकरणे आता उपांत्य फेरीच्या दृष्टीने गुंतागुंतीची झाली आहेत. असे असले तरी, तीन गुणांसह न्यूझीलंड पहिल्या स्थानी तर बांगलादेश एकमेव विजयासह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे बापरे, दिनेश कार्तिकच्या वडिलांकडून ऑस्ट्रेलियात नियमाचे उल्लंघन! वाचा सविस्तर
मेलबर्नमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या आयर्लंडचा इंग्लंडला धक्का, सामना 5 धावांनी टाकला खिशात





