चेन्नई सुपर किंग्जने यावर्षी आयपीएलमध्ये दोन वर्षांनी शानदार पुनरागमन करत आयपीएलचे तिसरे विजेतेपद मिळवले.
चेन्नईच्या या तिसऱ्या विजेतेपदाच्या प्रवासाची सुरवात 7 एप्रिलला रोहित शर्मा कर्णधार असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या विजयाने झाली होती. या सामन्यात चेन्नईच्या दुखापतग्रस्त केदार जाधवने चेन्नईला विजयासाठी 3 चेंडूत 7 धावा हव्या असताना षटकार ठोकत चेन्नईचा विजय निश्चित केला होता.
हा षटकार मारतानाचा फोटो केदारने 11 जूनला इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात त्याने ‘थ्रो बॅक, सामना जिंकून देणारा षटकार’ असे लिहिले आहे.
केदारच्या या पोस्टवर भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने कमेंट केली आहे. ही कमेंट करताना त्याने केदारला गंमतीने धमकीही दिली आहे. रोहितने केदारच्या पोस्टवर कमेंट करताना म्हटले आहे की, ‘पुढच्यावेळी ये तू…’
यावर केदारने उत्तर दिले की, “आय लव्ह यू, ब्रदर.” याआधीही या दोघांमध्ये असे संवाद झाले आहेत.
मुंबईसाठी तो पराभव पडला महागात:
आयपीएल 2018 च्या प्लेआॅफमध्ये स्थान मिळवण्यास मुंबईचा संघ अपयशी ठरला. त्यांना प्लेआॅफला पात्र ठरण्यासाठी फक्त 1 विजय कमी पडला. त्यामुळे पहिल्या सामन्यातील चेन्नई विरुद्धचा पराभव मुंबईसाठी महागात पडला होता.
कारण या सामन्यात मुंबई विजय मिळवण्याची पूर्ण संधी होती. चेन्नईच्या 9 विकेट गेल्या होत्या. त्यात फलंदाजीसाठी आलेला केदार जाधव दुखापतग्रस्त होता. त्यामुळे हा विजय मुंबईला सलत राहिला.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रहाणेचे अफगाणिस्तान कसोटी सामन्याबद्दल मोठे वक्तव्य
–यो यो फिटनेस टेस्ट म्हणजे काय रे भाऊ?
–चालू सामन्यातच एयर अॅम्बुलन्स थेट क्रिकेटच्या मैदानात
–भारतीय गोलंदाजामुळेच भारतीय संघ येणार कसोटी सामन्यात अडचणीत!