---Advertisement---

फिफा विश्वचषक: टिकाकरांपासून वाचण्यासाठी नेमारचे मागच्या दाराने पलायन…

On: बुधवार, जुलै 11, 2018 1:18 PM
---Advertisement---

रशिया।  फिफा विश्वचषकात 6 जुलैला झालेल्या सामन्यात ब्राझिल बेल्जियमकडून 2-1 असा पराभूत झाल्याने स्पर्धेबाहेर पडला.

संघ हा मायदेशी परतला असून चाहत्यांनी रियो दी जानिरो येथील विमानतळावर एकच गर्दी केली. मात्र त्यांना संघासोबत नेमार कुठेही दिसला नाही.

चाहत्यांना आणि टिकाकरांना त्याला टाळायचे होते म्हणून तो पाठीमागच्या दाराने बाहेर पडला. तसेच तो संघासोबत विमानात होता पण विमानतळावर तो कोणालाही दिसला नाही.

दुखापतीतून सावरल्यावर नेमार या स्पर्धेसाठी रवाना झाला होता. मात्र यात त्याला फारसे काही चांगले खेळता आले नाही.

या स्पर्धेत त्याला फक्त दोनच गोल करता आले. साखळी फेरीत त्याने हे गोल केले. त्याने आपला जास्त वेळ मैदानावर नाटके करण्यासाठीच घालवला.

नेमारने खेळलेल्या फिफा विश्वचषकातील चार सामन्यात मिळुन तब्बल १४ मिनिटांचा वेळ बरबाद केला  आहे.

बाद फेरीत मेक्सिको विरुद्धच्या सामन्यातही नेमारने केलेल्या असभ्य वर्तणूकीमुळे जगभरातील फु़टबॉल चाहत्यांनी त्याची सोशल मिडीयाच्या माध्यमातून चांगलीच खरडपट्टी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment