जगातील सर्व प्रकारचे क्रिकेट सध्या बंद आहे. पाकिस्तानमध्ये सुरु असलेली पाकिस्तान सुपर लीग ही सेमीफायनलपुर्वीच गुंडाळण्यात आली. जर सर्व सुरळीत झाले असते तर १८मार्च रोजी या लीगचा अंतिम सामना झाला असता.
ही लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्यानंतर या लीगमध्ये भाग घेतलेल्या जगभरातील अनेक खेळाडूंनी लीग तसेच आयोजकांचे आभार मानले. याचबरोबर पाकिस्तानच्याही खेळाडूंनी लीग आयोजक व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आभार मानले.
यात हसन अलीने एक खास ट्विट करत पाकिस्तानचे तसेच लीगचे आभार मानले. परंतु त्याने बरोबर केलेल्या ट्विटमुळेच तो ट्रोल झाला आहे. “आम्ही सर्व सामने खेळणार होतो. परंतु आयोजकांनी अतिशय योग्य निर्णय घेतला. प्रेक्षक आणि पीसीएलकडून गेले काही आठवडे जे प्रेम मिळालं त्यासाठी मी आपला आभारी आहे.” असा तो ट्विट होता.
यावर पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानने हसन अलीची फिरकी घेतली आहे. “नाईस वर्ड्स भाभी” अर्थात “वहिनी छान लिहीले आहे,” असा ट्विट त्याने हसन अलीच्या ट्विटवर केला आहे. यातुन त्याला स्पष्ट सांगायचे आहे का हसन अली नव्हे तर त्याच्या पत्नीने हा ट्विट केला आहे. यावर हसन अली सोशल मिडीयावर जोरदार ट्रोल होत आहे.
हसन अली पाकिस्तानकडून ९ कसोटी, ५३ वनडे व ३० टी२० सामने खेळला आहे. यात त्याने एकूण १४८ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेडिंग घडामोडी-
– बीडचा सुपूत्र संजय बांगरने नाकारली बांगलादेशची मोठी ऑफर
– विराटला सचिनच्या फेअरवेलच्या सामन्यात होती द्विशतकाची संधी
–…आणि त्या षटकाराने दिनेश कार्तिक हिट झाला!
-…तर धोनीने नक्कीच टीम इंडियात कमबॅक करायला पाहिजे!