आयपीएलच्या २०२१ हंगामातील २६ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर असा खेळला गेला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने स्पर्धेतील आपला तिसरा विजय मिळवला. कर्णधार केएल राहुल व हंगामातील आपला पहिला सामना खेळत असलेला हरप्रीत ब्रार हे पंजाबच्या विजयाचे नायक ठरले. मात्र, पंजाबचा फलंदाज निकोलस पूरन याच्यासाठी हा सामना विसरण्यासारखा राहिला.
पूरनची नकोशी कामगिरी
ख्रिस गेल व केएल राहुल यांनी आक्रमक फलंदाजी केल्यानंतर संघाची धावसंख्या १० षटकात ९० पार नेली होती. मात्र, गेल बाद झाल्यानंतर पंजाबचा डाव काहीवेळासाठी कोसळला. यामध्ये विश्वासू फलंदाज निकोलस पूरन हा तीन चेंडू खेळून एकही धाव न करता माघारी परतला.
यासह पूरनने स्पर्धेतील सातव्या सामन्यात आपला शून्य नोंदविला. पूरन या सात सामन्यात केवळ २८ धावा बनवू शकला आहे. चौथ्या शुन्यासह पूरन आयपीएलच्या एका हंगामात चार वेळा शून्यावर बाद होणारा पाचवा फलंदाज ठरला.
आयपीएलमध्ये सर्वप्रथम एका हंगामात चार सामन्यात शून्यावर बाद होणारा पहिला फलंदाज हर्षेल गिब्स होता. गिब्सने २००९ आयपीएलमध्ये ही नकोशी कामगिरी केली होती. त्यानंतर, आयपीएल २०११ मध्ये मिथुन मन्हासही चार सामने खाते खोलू शकला नव्हता. सध्या सनरायझर्स हैदराबादचा भाग असलेला मनिष पांडे २०१२ आयपीएलमध्ये चार सामन्यात एकही धाव न करता माघारी परतलेला. २०२० आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या शिखर धवनने या हंगामात चार सामन्यात एकही धाव काढली नव्हती.
पूरनचा खराब फॉर्म
टी२० क्रिकेटचा आदर्श खेळाडू असलेला पूरन या हंगामात पूर्णतः अपयशी ठरलेला दिसून आला आहे. तो डायमंड डक (एकही चेंडू न खेळता बाद), गोल्डन डक (पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद), सिल्वर डक (दुसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद) व तिसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद होणारा फलंदाज बनला आहे. एका डावात त्याने ९ तर अन्य एका डावात १९ भावा त्याने बनविल्या आहेत. तर एका सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या –
PBKS vs RCB: फलंदाजांनी ठोकले, गोलंदाजांनी रोखले; पंजाबचा बेंगलोरला ३४ धावांनी पराभवाचा जोरदार धक्का
कौतुकास्पद! सचिन तेंडुलकरच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातील महिला क्रिकेटपटूने केले रक्तदान
काईल जेमिसनने नेटमध्ये विराटला गोलंदाजी करण्यास दिला नकार, ‘हे’ होते मोठे कारण