---Advertisement---

6 चौकार अन् 7 षटकार…मैदानावर पुन्हा आलं निकोलस पूरनचं वादळ!

On: सोमवार, सप्टेंबर 23, 2024 10:20 AM
---Advertisement---

कॅरिबियन प्रीमियर लीग 2024 च्या 25व्या सामन्यात निकोलस पूरनचा कहर पाहायला मिळाला. त्यानं त्रिनबागो नाइट रायडर्सला सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स विरुद्ध 7 विकेट्सनं विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स संघानं 20 षटकात 193/4 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, त्रिनबागो नाईट रायडर्सनं 18.3 षटकात 197/3 धावा करून लक्ष्य गाठलं. निकोलस पूरन (43 चेंडूत 93*) याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याचा संघ सात सामन्यांत पाच विजयांसह 10 गुण घेऊन चौथ्या स्थानावर आहे. तर सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रिओट्स 10 सामन्यांतील 9 पराभवानंतर 2 गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्सची सुरुवात खराब झाली. एविन लुईस पहिल्याच षटकात 2 धावा काढून बाद झाला. यानंतर कर्णधार आंद्रे फ्लेचरनं काइल मेयर्ससह दुसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. मेयर्सनं 30 चेंडूत 60 धावांची दमदार खेळी खेळली, ज्यात आठ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.

रिले रुसोनं 11 चेंडूत 20 धावांचं योगदान दिलं. फ्लेचरनं डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी 61 चेंडूत 93 धावा केल्या. त्यानं चार चौकार आणि सहा षटकार मारले. त्रिनबागो नाईट रायडर्सकडून ख्रिस जॉर्डननं सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर अकील हुसेन आणि झायदान सील्स यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

लक्ष्याचा पाठलाग करताना त्रिनबागो नाइट रायडर्सला जेसन रॉयनं चांगली सुरुवात करून दिली. त्यानं केसी कार्टीसोबत पहिल्या विकेटसाठी 43 धावा जोडल्या. कार्टी 13 धावा करून सहाव्या षटकात बाद झाला. रॉयनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं 34 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं 64 धावा केल्या. टीम डेव्हिड 9 धावा करून बाद झाला. येथून पुढे निकोलस पूरनचं तुफान आलं. त्यानं कर्णधार कायरन पोलार्ड (10*) सोबत फक्त 19 चेंडूत 58 धावांची नाबाद भागीदारी केली आणि संघाला विजयापर्यंत पोहचवलं. पूरननं 43 चेंडूंत सहा चौकार आणि सात षटकारांसह नाबाद 93 धावा केल्या.

हेही वाचा – 

भारत-बांगलादेश दुसरी कसोटी कधी आणि कुठे खेळली जाईल? टीव्हीवर लाईव्ह कुठे पाहायचा सामना?
दक्षिण आफ्रिकेनं लाज राखली, अफगाणिस्ताननं 3-0 ने केला असता क्लीन स्वीप
3 युवा खेळाडू ज्यांनी दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली, भारताच्या कसोटी संघात मिळू शकते जागा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---