आयसीसी विश्वचषक 2023ते क्वॉलिफायर सामने सध्या झिम्बाब्वेमध्ये खेळले जात आहे. क्वॉलिफायर्समधील 18वा सामना वेस्ट इंडीज आणि नेदर्लंडमध्ये खेळला गेला. सुपर ओव्हरमध्ये नेदरलंडने वेस्ट इंडीजला पराभूत केले. पण तत्पूर्वी वेस्ट इंडीजसाठी यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन याने शतक ठोकले. या खेळीनंतर पूरनने आपले नाव खास यादीत दुसऱ्या क्रमांकावर नोंदवले आहे.
निकोलस पूरन (Nicholas Pooran) याने नेदर्लंडविरुद्धच्या या सामन्यात अवघ्या 63 चेंडूत शतक ठोकले. वेस्ट इंडीजसाठी एकाद्या फलंदाजाने केलेले हे तिसरे सर्वात वेगवान शतक ठरले. यादरम्यान त्यांचा माजी दिग्गज ख्रिस गेला याचा विक्रमही पूरनकडून मोडीत निघाला. वेस्ट इंडीजसाठी पहिल्या चार सर्वात वेगवान शतकपैकी दोन षटके ख्रिस गेलच्याच नावावर आहेत. त्यांचा माजी दिग्गज ब्रायन लारा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने अवघ्या 45 चेंडूत शतक ठोकले. होते.
वेस्ट इंडीजसाठी सर्वात वेगवान शतक करणारे फलंदाज
ब्रायन लारा – 45 चेंडूत शतक विरुद्ध बांगलादेश (1999)
ख्रिस गेल – 55 चेंडूत शतक विरुद्ध इंग्लंड (2019)
निकोलस पूरन – 63 चेंडूत शतक विरुद्ध नेदर्लंड (2023)
ख्रिस गेल – 69 चेंडूत शतक विरुद्ध झिम्बाब्वे (2003)
निकोलस पूरनच्या या वादळी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने 50 षटकांमध्ये 374 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात नेदर्लंड संघानेही 50 ,टकांमध्ये 9 बाद 374 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला. पंचांनी सामना निकाली लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवली आणि नेदर्लंडने यात बाजी मारली. सुपर ओव्हरमध्ये नेदरलॅन्डसाचा वॅन बील () फलंदाजीला आला होता. जोसन होल्डर याने टाकलेल्या सुपर ओव्हरमध्ये बीलने तीन षटकार आणि तीन चौकार मारत 30 धावा घेतल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना त्यानेच आठ धावा देत दोन्ही फलंदाजांना तंबूत धाडले. नेदरलॅन्ड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामना रोमांचक ठरला. पण दोन्ही संघांसाठी या सामन्याचा निकाल जास्त महत्वाचा नव्हता. कारण क्वॉलिफायर सामन्यांमध्ये ग्रुप ए मधील नेदरलॅन्ड, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज सुपर 6 साठी पात्र ठरले आहेत. (Nicholas Pooran scored the third fastest century for his team against the Netherlands)
महत्वाच्या बातम्या –
ASHES 2023 । दुसऱ्या कसोटीतून मोईन अलीचा पत्ता कट! ‘या’ इंग्लिश गोलंदाजाला मिळाले संघात स्थान
MPL 2023: पुणेरी बाप्पा की ईगल नाशिक टायटन्स? कोण ठरणार क्वालिफायर 2 साठी पात्र?