---Advertisement---

कॅरेबियन पॉवर! षटकार अन् तोही 113 मीटर लांब….चेंडू पुन्हा दिसलाच नाही

---Advertisement---

वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ लीगमध्ये त्यानं आपल्या फलंदाजीनं धुमाकूळ घातला आहे. 11 ऑगस्ट रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात निकोलस पूरननं एक गगनचुंबी षटकार मारला, तोही तब्बल 113 मीटरचा!

मँचेस्टर ओरिजिनल्स आणि नॉर्दर्न सुपरचार्जर्स यांच्यातील सामन्यात निकोलस सुपरचार्जर्सकडून खेळत होता. मॅचेस्टर ओरिजिनल्स संघानं प्रथम फलंदाजी करताना 100 चेंडूत 7 विकेट गमावत 152 धावा केल्या. ओरिजिनल्ससाठी कर्णधार फिल सॉल्टनं दमदार खेळी केली. त्यानं केवळ 28 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीनं 61 धावा ठोकल्या. मँचेस्टर ओरिजिनल्सच्या डावातील सर्वात लांब षटकार जेमी ओव्हरटननं हाणला. डावातील 99व्या चेंडूवर त्याच्या बॅटमधून 107 मीटर लांब षटकार निघाला.

नॉर्दर्न सुपरचार्जर्सला विजयासाठी 100 चेंडूत 153 धावांची आवश्यकता होती. सुपरचार्जर्सची सुरुवात खराब झाली. मात्र यानंतर निकोलस पूरननं संघाचा डाव सांभाळत एकहाती विजय मिळवून दिला. निकोलस पूरन शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्यानं 33 चेंडूत 8 षटकारांसह 66 धावा केल्या.

निकोलस पूरननं नॉर्दर्न सुपरचार्जर्सच्या डावातील 74व्या चेंडूवर 113 मीटर लांब षटकार मारला. त्या मारलेला चेंडू सरळ मैदानाबाहेर गेला. त्याच्या या फटक्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

निकोलस पूरनच्या फटकेबाजीमुळे नॉर्दर्न सुपरचार्जर्सनं 3 चेंडू राखून 153 धावांचं लक्ष्य गाठलं. ‘द हंड्रेड’मध्ये आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमधला नॉर्दर्न सुपरचार्जर्सचा हा चौथा विजय आहे. मँचेस्टर ओरिजिनल्सनं तितक्याच सामन्यांत 6 पराभव पाहिले आहेत.

हेही वाचा –

38 वर्षांनंतर प्रथमच भारतीय खेळाडू ठरले अयशस्वी! या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाही एकही शतक
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा कसा होणार फायदा? माजी दिग्गजाने सांगितले समीकरण
सुरेश रैना पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, ‘या’ टी20 लीगमध्ये मिळाली खास जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---