पावसानं प्रभावित झालेल्या टी20 विश्वचषक 2024 च्या 35व्या सामन्यात इंग्लंडनं नामिबियाचा 41 धावांनी पराभव केला. पावसामुळे हा सामना प्रत्येकी 10 षटकांचाच करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 10 षटकांत 122 धावा केल्या. प्रत्युत्तरात, नामिबियाचा संघ केवळ 84 धावाच करू शकला. या सामन्यात नामिबियाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज निकोलस डेव्हिन ‘रिटायर्ड आऊट’ झाला. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात असं प्रथमच घडलं आहे.
10 षटकांत मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या नामिबियाच्या संघाला मायकेल लिंजेननं चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र कर्णधार निकोलस डेव्हिनला दुसऱ्या टोकाकडून चांगली फलंदाजी करता आली नाही. सहाव्या षटकात त्यानं 16 चेंडूत 18 धावा केल्या होत्या. यानंतर तो ‘रिटायर्ड आऊट’ झाला. त्याच्या जागी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा डेव्हिड व्हिस फलंदाजीला आला.
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा खेळाडू ‘रिटायर्ड आऊट’ झाला आहे. ‘रिटायर्ड आऊट’ होण्यापूर्वी फलंदाजाला पंचाला सांगाव लागतं की तो क्रीज सोडत आहे. एखादा फलंदाज ‘रिटायर्ड हर्ट’ झाला असेल तर तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. परंतु जर तो ‘रिटायर्ड आऊट’ झाला तर पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकून नामिबियानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूक (47 धावा) आणि जॉनी बेअरस्टो (31 धावा) यांनी चांगली फलंदाजी केली. त्यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडचा संघ 10 सामन्यांत 100 पेक्षा जास्त धावा करू शकला. लक्ष्याचा पाठलाग करताना, नामिबियाच्या संघाला 10 षटकांत 84 धावाच करता आल्या. नामिबियाकडून डेव्हिड व्हिसेनं सर्वाधिक 27 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचे दिग्गज फलंदाज अमेरिकेत पूर्णपणे प्लॉप, आकडेवारी पाहून बसेल धक्का!
बाबरपासून रिजवानपर्यंत, सगळ्यांचे पगार कापणार पीसीबी! पाकिस्तानी खेळाडूंवर बोर्ड नाराज
टी20 विश्वचषकादरम्यान दिग्गज खेळाडूनं घेतली निवृत्ती, दोन देशांकडून खेळला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट